छत्रपती संभाजीनगर : वाहनवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, चालकाचा मृत्यू

शिऊर बंगला येथील घटना
Acccident
छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील शिऊर बंगला येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला.Pudhari News Network
Published on
Updated on

शिऊर : छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील शिऊर बंगला येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री (दि. ६) ९:३० वाजेच्या सुमारास घडली. हेमंत कांतीलाल चुडीवाल (रा.शिऊर, ता.वैजापूर,वय ४५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेमंत चुडीवाल हे शिऊर बंगला येथून शिऊर गावात आपल्या घरी क्रमांक एम.एच.२० एफ.जी.७३९१ या वाहनातून घरी जात असताना वाहनवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या साईडला खड्यात पडले. यात हेमंत चुडीवाल हे गंभीर जखमी झाले. पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना प्राथमिक उपचारासाठी शिऊर बंगला येथे दाखल केले.यावेळी हेमंत यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषित केले.

Acccident
Weather Update | पावसाचा आजपासून राज्यभरात जोर वाढणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news