Chhatrapati Sambhajinagar crime : पैशासाठी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून मारहाण

सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar crime
पैशासाठी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून मारहाणFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : व्यवसायासाठी घेतलेले १ लाख रुपये वेळेत परत न केल्याने एका डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून त्याला गोदामात डांबून तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी ६ ते रात्री ८:३० या वेळेत मंजरपुरा ते नारेगावदरम्यान घडली.

राफे खान रशीद खान (रा. सेंट्रल नाका) आणि त्याचे दोन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी फैजान मोहम्मद सुब्हान खान (३७, रा. मंजुरपुरा) हे स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये ओळखीचा आरोपी राफे खान याच्याकडून व्यवसायासाठी १ लाख रुपये उसने घेतले होते. त्यापैकी ३० हजार रुपये त्यांनी परत केले असून, उर्वरित रकमेसाठी वेळ मागितला होता.

Chhatrapati Sambhajinagar crime
Chatrapati Sambhajinagar : नदी ओलांडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ...

१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फिर्यादी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले असता, राफे खान आणि त्याच्यासोबतच्या दोन अनोळखी साथीदारांनी त्यांना गाठले. पैशाची मागणी करत आरोपींनी फैजान यांना बळजबरीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. फैजान यांनी आरडाओरड केली असता आरोपी राफे खान याने दुचाकीची चावी फिर्यादीला टोचून त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवले आणि नारेगाव येथील एका बंद गोदामात नेले.

गोदामात डांबून मारहाणीचा व्हिडिओ काढला

नारेगावात बंद गोदामात नेल्यानंतर आरोपींनी फैजान यांना हाता-चापटाने आणि लोखंडी रॉडने डाव्या दंडावर व डाव्या मांडीवर बेदम मारहाण केली. तुझ्या मुलांना उचलून नेईन आणि पोलिसांत तक्रार दिली तर बघून घेईन, अशी धमकी देत आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर रात्री ८:३० च्या सुमारास त्यांना घरासमोर सोडून आरोपी पसार झाले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar crime
HSC exam copy cases : परीक्षेत दोन विद्यार्थ्यांकडे सापडले मोबाईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news