Girls Kidnapping : 'कुरकुरे'चे आमिष अन् तोंड दाबून अपहरण! तरुणांच्या थरारक पाठलागामुळे वाचला ९ वर्षीय चिमुकलीचा जीव

शहागंजमधील घटना; नालीत रिक्षा फसल्याने अपहरणकर्त्याचा पोबारा, सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल
Girls Kidnapping
Girls KidnappingPudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहागंज बाजारपेठेतून बुधवारी (दि. २२ जुलै) रात्री एका ९ वर्षीय चिमुकलीचे रिक्षातून तोंड दाबून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र, परिसरातील तीन सुजाण नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि केलेल्या थरारक पाठलागामुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका नालीत रिक्षा अडकल्याने आरोपीने पळ काढला आणि या चिमुकलीची सुखरूप सुटका झाली.

Girls Kidnapping
Chhatrapati Sambhajinagar water supply : पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबर शेवटची डेडलाईन

तोंड दाबून रिक्षात कोंबले

या थरारक घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चिमुकलीचे वडील एका सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तिची आत्या शहागंजमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही ९ वर्षांची चिमुकली आत्याच्या ठेल्याजवळ आली होती. तिला काहीतरी खाऊ द्यावा म्हणून आत्याने पैसे देऊन तिला जवळच्या दुकानात पाठवले. त्याचवेळी तिथे एक रिक्षा (क्र. एमएच २० इएफ ४४२८) आली. चालकाने या मुलीला गाठले आणि "मी तुझ्या आंटीला ओळखतो, आपण कुरकुरे घेऊन येऊ," असे म्हणत तिच्या हातात १०० रुपये दिले. मात्र, मुलगी रिक्षात बसण्यास तयार नसल्याचे पाहून या नराधमाने तिचे तोंड दाबले आणि तिला बळजबरीने रिक्षात कोंबले.

Girls Kidnapping
Chhatrapati Sambhajinagar crime : घातक रसायनाप्रकरणी पुन्हा दोन जण पोलिसांच्या ताब्यात

तीन तरुणांचा पाठलाग अन् रिक्षा खड्ड्यात

चिमुकलीचे तोंड दाबून तिला पळवून नेले जात असल्याचा हा प्रकार आरेफ सईद खान, शेख युसुफ शेख यासीन आणि मोसिन खान मोईन खान या तीन जागरूक नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पळणाऱ्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच अपहरणकर्ता घाबरला. या गडबडीत त्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोषागार कार्यालयाकडे (रजिस्ट्री ऑफिस) रिक्षा घुसवली. याच पळापळीत त्याची रिक्षा तेथील एका नालीत जाऊन फसली.

Girls Kidnapping
Chhatrapati Sambhajinagar crime : सहा कोटींचा अपहार : लोक आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघे गजाआड

चिमुकली पालकांच्या स्वाधीन, आरोपीचा शोध सुरू

पाठलाग करणारे तरुण अगदी जवळ आल्याचे पाहून आणि रिक्षा नालीत फसल्याने अपहरणकर्त्याने रिक्षा व चिमुकलीला तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घाबरलेल्या चिमुकलीला सुखरूप तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली. याप्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news