वैजापूर : तालुक्यातील बोरसर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती करून देण्याचे आमिष दाखवून शिक्षक दम्पत्याचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचे गंभीर प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणी पाचही आरोपींचा जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. सुदाम उबाळे (रा. माळीघोगरगाव), फादर जेरॉल्ड रिबेलो (रा. बोरसर, मूळ रा.वसई, मुंबई), फादर आशिष म्हस्के (रा. माळीघोगरगाव), संजय रुपेकर (रा. सेंट थॉमस चर्च, सेव्हन हिल, छत्रपती संभाजीनगर),विनोद शेळके (रा. जामगाव, ता. गंगापूर, मूळ रा. संगमनेर) असे आरोपींची नाव आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब आप्पासाहेब साठे (३७, रा. वाहेगाव-मांजरी, ता. गंगापूर, ह.मु. वैजापूर) आणि त्यांची पत्नी पूजा हे २०२४ मध्ये बोरसर येथील शांतीसदन प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांना सुरुवातीला कोणतेही लिखित नियुक्ती आदेश दिले गेले नव्हते. शाळेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यासाठी आणि स्थायी शिक्षकाची नोकरी देण्याच्या आमिषाने पाच लाखांची मागणी करण्यात आली.
यासाठी माळीयासाठी माळीघोगरगाव येथील चर्चमध्ये फादर आशिष म्हस्के यांच्या माध्यमातून पती-पत्नीचे धर्मांतर करण्यात आले. परंतु, संस्थाचालकांनी यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांच्याही धर्मांतरासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. दम्पत्याने यास स्पष्ट नकार देत पैसे परत करून नोकरी नाकारली आणि पूजा यांनी नोकरी सोडली.
या जातीय व आर्थिक शोषणामुळे कुटुंबाला मोठ्या मानिसक त्रासाला सामोरे जावे लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना यापूर्वी न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर ८ ऑक्टोबर गुरुवार रोजी सरकार पक्षातर्फे ॲड. नानासाहेब जगताप यांनी युक्तिवाद केला. त्या युक्तिवादाला ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
घोगरगाव येथील चर्चमध्ये फादर आशिष म्हस्के यांच्या माध्यमातून पती-पत्नीचे धर्मांतर करण्यात आले. परंतु, संस्थाचालकांनी यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांच्याही धर्मांतरासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. दम्पत्याने यास स्पष्ट नकार देत पैसे परत करून नोकरी नाकारली आणि पूजा यांनी नोकरी सोडली.