

Extorted ₹1.5 crore for a ₹1 crore loan; demanded another ₹1.25 crore as extortion
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बांधकाम व्यवसायासाठी घेतलेल्या १ कोटी रुपयांच्या कर्जापोटी दीड कोटी रुपये परत करूनही, एका बांधकाम व्यावसायिकाला आणखी सव्वा कोटी (१.२५ कोटी) रुपयांची खंडणी मागून आरोपी प्रवीण गरबडे प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास दोन नवीन फ्लॅट्स (किंमत १.५० कोटी) अक्षरशः वेठीस धरल्याचा नावावर करण्याची मागणी करत, गुंड लावून बिल्डरच्या बांधकाम साईट्स बळजबरीने बंद पाडण्यात आल्या आणि त्यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
राहुल साहेबराव चाबुकस्वार, आकाश साळुंखे, प्रवीण पंडितराव गरबडे, अमोल साळुंखे, नीलेश रांजने आणि इतर २ ते ३ गुंडांवर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात खंडणी, मारहाण आणि खासगी सावकारीचा बुधवारी (दि.६) गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गरबडेला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
फिर्यादी सुनील शामराव पाटील (६१, रा. न्यू एसबीएच कॉलनी, शहानूरवाडी) यांच्या तक्रारीनुसार, १९९५ पासून नेहा कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम व्यवसाय करतात. सप्टेंबर २०२३ मध्ये व्यवसायासाठी १ कोटी रुपयांच्या भांडवलाची गरज होती. त्यांचे मित्र गजानन काठोले यांच्या मध्यस्थीने त्यांची ओळख गरबडेशी झाली. गरबडेने त्याचा मित्र राहुल चाबुकस्वारशी ओळख करून दिली. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी चाबुकस्वार आणि आकाश साळुंखे यांच्या बँक खात्यातून पाटील यांच्या बँक खात्यात १ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
या रकमेसाठी दरमहा ४% व्याज आणि हमी म्हणून गारखेडा व देवळाई येथील ६ फ्लॅट्सचे नोटराईज्ड करारनामे लिहून घेण्यात आले. तसेच कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल गरबडेला १२ लाख रुपये कमिशन आणि ३ महिन्यांचे १२ लाख रुपये आगाऊ व्याज पाटील यांनी रोखीने दिले. ५% व्याज, २ लाखांचा दंड अन् थेट गुंडगिरी जानेवारी २०२४ मध्ये गरबडेने दरमहा ५% व्याज देण्याची सक्ती केली आणि व्याज देण्यास उशीर झाल्यास २ लाख रुपयांचा दंड उकळण्यास सुरुवात केली.
मे २०२५ मध्ये व्याज देण्यास उशीर झाल्याने, चाबुकस्वार याने ४-५ गुंड घेऊन नेहा कन्स्ट्रक्शनच्या सूतगिरणी चौकातील कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना हाकलून दिले आणि कुलूप ठोकले. गारखेड्यातील धनश्री अपार्टमेंट साईटवर जाऊन कामगारांनाही धमकावून काम बंद पाडले. १७नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपींनी थेट पाटील यांच्या शहानूरवाडी येथील घरात घुसून वॉचमनला मारहाण करत घरालाही कुलूप लावले. पाटील यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचा राग आल्याने, आरोपींनी त्यांना कार्यालयात मारहाण केली तसेच नवीन साईटवरील दोन फ्लॅट्सची इसार पावती बळजबरीने लिहून घेतली.
पाच दिवसांपूर्वीच दरोड्याचा गुन्हा राहुल चाबुकस्वार (४५, रा. पुंडलिकनगर) आणि सुधीर कातकडे यांनी १२ कोटी रुपयांच्या कमिशनच्या वादातून १० ते १२ गुंडांना पाठवून औद्योगिक कंत्राटदार ज्ञानेश्वर बारे यांना चिकलठाणा एमआयडीसी परिसरात कार्यालयात दरोडा टाकून इनोव्हा कार व ३ लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पाच दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर चाबुकस्वारच्या गुंडगिरीचा हा नवा कारनामा समोर आला आहे. तसेच हनुमाननगर चौकात कुख्यात गुंड दिवेकर याने केलेल्या गोळीबार प्रकरणात सहभाग असणे आणि आरोपींना रसद पुरवल्याच्या आरोपाखाली चाबुकस्वारला पोलिसांनी अटकही केली होती.
शेवटी सव्वा कोटीची खंडणी अन् पोलिसांत धाव
२७ ऑगस्ट २०२६ रोजी गरबडे याने पाटील यांना भेटून अतिरिक्त १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास नवीन प्रकल्पातील ७५ लाख रुपयांचे दोन फ्लॅट्स (एकूण १.५० कोटी) नावावर कर, अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. सततच्या दहशतीमुळे आणि आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने पाटील आधी गप्प होते. मात्र, आरोपींवर अलीकडेच गुन्हा दाखल झाल्याचे वृत्तपत्रात वाचल्यानंतर त्यांनी हिंमत एकवटून पोलिसांत धाव घेतली. पाटील यांनी यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग्स, सीसीटीव्ही फुटेज, आणि पैशांच्या ट्रान्ॉक्शनचा तपशील पोलिसांना दिला आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेत प्रारंभी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक अमोल देशमुख हे प्रकरणाचा तपास करत आहे.
दीड कोटीची परतफेड, तरीही छळ सुरूच
मार्च २०२६ पर्यंत पाटील यांनी १ कोटीच्या कर्जापोटी मुद्दल, व्याज आणि दंड स्वरूपात १ कोटी ५० लाख रुपये रोखीने आणि बँक खात्याद्वारे गरबडेच्या खात्यात २७ लाख २७ हजार रुपये आरोपींना परत केले. तरीही छळ थांबला नाही. जुलै २०२६ मध्ये आरोपींनी पाटील यांच्या विविध बांधकाम साईट्सवर (धनश्री अपार्टमेंट, केशव स्काय लाईन) गुंड पाठवून कामगारांना हाकलून दिले आणि काम बंद पाडले. तसेच पाटील यांच्या घरावर दगडफेक करून त्यांच्या पत्नीला घराचे दरवाजे-खिडक्या काढून घेऊन जाईन अशी धमकी दिली.