Chhatrapati Sambhajinagar Crime : वकिलाचे घर फोडून तब्बल ११ तोळे सोने, ३.५ लाखांची रोख लंपास

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेल्या एका वकिलाचे बंद घर फोडून चोरट्धांनी तब्बल ११ तोळे सोने (बाजारभावानुसार सुमारे १७ लाख) आणि साडेतीन लाखांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (दि. १२) मध्यरात्री सिडको एन ३ भागात घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रफुल्लकुमार निवृत्तीराव पिंपळगावकर (३८, रा. प्लॉट नं. ३६५, सूर्या पार्कजवळ, एन-३, सिडको) यांच्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. शनिवारी (दि १२) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते कुटुंबासह परभणी जिल्ह्यातील पालम या आपल्या मूळ गावी गेले होते. रविवारी (दि. १३) दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचे घरमालक देविदास विद्यागर यांनी प्रफुल्लकुमार यांना घराचे कुलूप उघडे असल्याचा फोटो पाठवला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar ST Bus : एसटीच्या टोल खर्चाला ब्रेकच नाही; पाच महिन्यांत २५ लाखांचा अतिरिक्त भार

हा फोटो पाहिल्यानंतर प्रफुल्लकुमार यांनी आपला भाऊ शरण कार्तिक याला घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. शरण याने घरमालकासोबत घरात जाऊन प्रफुल्लकुमार यांना व्हिडीओ कॉल केला, तेव्हा बेडरूममधील लोखंडी कपाट उघडे असल्याचे आणि सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. ज्या ड्रॉवरमध्ये पैसे आणि दागिने ठेवले होते, तो ड्रॉवर रिकामा असल्याचे व्हिडीओ कॉलवर निष्पन्न झाले.

पिंपळगावकर यांनी घर गाठले. पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुंडे यांनी पथकासह धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कन्हाळे करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Marathwada Water Storage : मराठवाड्यात धरणांत ६६ टक्के पाणी; १४४ दिवस पुरेल एवढचा चारा

चोरट्यांनी लांबवलेला ऐवज

  • सोन्याच्या ४ साखळ्या (३.७ तोळे)

  • सोन्याचे मिनी गंठण (२ तोळे)

  • सोन्याचे ब्रेसलेट (२ तोळे)

  • दोन अंगठ्या (१ तोळे)

  • मुलांच्या सोन्याच्या गिफ्ट वस्तू (२ तोले)

  • सोन्याची कानातील रिंग (६ ग्रॅम)

  • चांदीचे बाजूबंद, पैंजण, साखळी आणि रोख ३ लाख ५० हजार असा ऐवज चोरीला गेला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news