Sambhajinagar chain snatching : चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ; दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडले

एकाच रात्री मुकुंदवाडी, सिडकोत दीड तासाच्या अंतराने घडल्या घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime
chain snatching file photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच असून, शतपावली करणाऱ्या महिलांना टार्गेट केले जात आहे. मंगळवारी (दि.31) रात्री मुकुंदवाडी आणि सिडको भागात अवघ्या दीड तासाच्या अंतराने दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. या घटना रात्री पावणेनऊ ते साडेदहा वाजेदरम्यान घडल्या. याप्रकरणी मुकुंदवाडी आणि सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना : पतीसोबत दुचाकीने जाताना मंगळसूत्र ओढले

नागेश्वरवाडी येथील रहिवासी माया भागवत चव्हाण (60) या मंगळवारी रात्री 8:45 च्या सुमारास पतीसोबत दुचाकीवरून जात होत्या. त्या जिजामाता चौकाजवळ पोहोचल्या असता, पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार दोन चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील 15 ग््रॉमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. या धक्क्यातून सावरल्यानंतर चव्हाण यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Manoj Jarange | महाराजांचे पुतळे उभारून इतर जातींना मराठा समाजाच्या अंगावर घालण्याचा डाव : जरांगे

दुसरी घटना : अंगावर गाडी घालत सोन्याची पोत हिसकावली

फिर्यादी अर्चना भाऊसाहेब पवार (39, रा. एन-11) या रात्री 10:30 च्या सुमारास आपल्या मैत्रिणीसह शतपावली करत होत्या. टीव्हीसेंटर परिसरातील कठाळे हॉस्पिटलजवळ येताच 30 ते 35 वयोगटातील दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले. अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून वाद निर्माण केला. अर्चना यांनी त्याला माझ्या अंगावर गाडी घालतो का, असे म्हणत सुनावले. त्यानंतर एका चोरट्याने त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा करून जवळ येत काही समजण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील 8 ग््रॉमची सोन्याची पोत हिसकावून टीव्हीसेंटर चौकाच्या दिशेने धूम ठोकली.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

एकाच रात्री दीड तासाच्या अंतरात झालेल्या या दोन चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यांत महिलांना टार्गेट करून दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Hingoli school bus accident : स्कूल बसच्या धडकेत 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news