

छत्रपती संभाजीनगर : कंपनी कामगारांची ने-आण करणाऱ्या सुसाट बसने दुचाकीस्वाराला चिरडले. या घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (दि २४) रात्री बाराच्या सुमारास ए.एस क्लब जवळ घडली.
दुचाकीस्वार (एम एच २३ जे १२९७) ए एस क्लब भागातून जात असताना त्याला पाटील ट्रासपोर्टच्या बसचालकाने (एमएच २० सिटी २५९९ चिरडले. यात दुचाकीचा चक्काचूर झाला, तर चाकाखाली येऊन दुचाकीस्वार चिरडला. वृत्त देऊपर्यंत मृताचे नाव समजू शकले नव्हते. त्याला घाटीत दाखल करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बस अपघातस्थळीच उभी होती.