

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे दुचाकी घसरून अपघातात एकजण ठार झाला. दादासाहेब भीमराव माने असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भीमराव दादू माने यांनी शमशुद्दीन शरफुद्दीन मुलाणी (रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) याच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.
शमशुद्दीन मुलाणी व दादासाहेब माने हे दोघे दुचाकीवरून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते. यावेळी शमशुद्दीन हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगाने दुचाकी चालवत होता. भोसे येथे गेल्यानंतर त्यांची दुचाकी रस्त्यावरून घसरली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या दादासाहेब माने यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शमशुद्दीन याच्यावर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.