Chhatrapati Sambhajinagar new MIDC : भेंडाळा येथे ३५५ हेक्टर जागेत नवीन एमआयडीसी

सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केली पाहणी, तांत्रिक बाबींचा घेतला आढावा
Chhatrapati Sambhajinagar new MIDC
भेंडाळा : नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जागेची पाहणीप्रसंगी एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना माहिती देताना प्रादेशिक अधिकारी अमित भामरे व अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : उद्योगनगरीतील जमीन संपुष्टात आल्याने पुणे महामार्गावरील भेंडाळा येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ३५५ हेक्टर जागेत नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसह दोन दिवसांपूर्वीच भेंडाळा येथे प्रत्यक्ष जाऊन या जागेची पाहणी करत तांत्रिक बाबींचा आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याची प्रमुख उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत वाळूज, शेंद्रा आणि चिकलठाणा यासारख्या विद्यमान औद्योगिक क्षेत्रांमधील जागा पूर्णपणे भरल्याने जमिनीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. टोयोटो, एथर, जेएसडब्ल्यूसह इतर नामांकित कंपन्यांकडून कोट्यवधीची गुंतवणूक करत प्रकल्प उभारणी सुरू आहे. त्यामुळे डीएमआयसीमधील लॅण्ड बँकही आटली आहे. त्यात अनेक कंपन्या, उद्योजकांकडून सातत्याने जमिनीची मागणी सुरू आहे. यामुळे पुणे महामार्गावरील भेंडाळा येथील शेती महामंडळाची ३५५ हेक्टर जागा एमआयडीसीकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे.

Chhatrapati Sambhajinagar new MIDC
Mumbai Pune Expressway Missing Link: बंदी झुगारुन मिसिंग लिंकवरुन अवजड वाहतूक; तीन महिन्यांत ६२१ वाहने धावली

यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, एन. राठोड व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

...या तांत्रिक बाबींचीही घेतली माहिती

या पाहणीदरम्यान वर्षा ठाकूर यांनी परिसराची भौगोलिक स्थिती, रस्ते कनेक्टिव्हिटी, पाणी व वीज पुरवठ्याची सोय या तांत्रिक बाबींची माहिती घेतली. आवश्यक त्या शासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर शहराला आणखी एक एमआयडीसी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हजारोंना रोजगार

पाईपलाईनमध्ये असलेली कोट्यवधींची गुंतवणूक आणि शहराचा वाढता औद्योगिक विस्तार लक्षात घेता नव्या एमआयडीसीसाठी जागेची नितांत गरज होती. ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरणानंतर या भागात मोठा औद्योगिक प्रकल्प उभा राहू शकेल. यामुळे केवळ नव्या गुंतवणुकीला चालना मिळणार नसून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar new MIDC
Anandraj Ambedkar : '५९ जाती गुण्यागोविंदाने नांदताना सरकारने भांडणे लावू नयेत'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news