Pregnant Woman Death: चारित्र्यावर संशय, छळ अन् बळजबरीने घटस्फोट; १९ वर्षीय गर्भवतीचा मृत्यू

Pregnant Woman Death in Chhatrapati Sambhajinagar: चारित्र्यावर संशय, सततचा शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने घराच्या गच्चीवरून उडी मारल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे.
crime news
crime newsFile Photo
Published on: 
Updated on: 

Pregnant Woman Death in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : चारित्र्यावर संशय, सततचा शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने घराच्या गच्चीवरून उडी मारल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. पतीने बळजबरीने घटस्फोटाचा बाँड करून घेतल्याचा आरोपही माहेरच्यांनी केला आहे.

२५ ऑक्टोबरच्या रात्री बीड बायपास परिसरातील आलोकनगर येथे ही घटना घडली. सोनू विनोद राठोड असे मृत विवाहितेचे नाव आहे. उपचारादरम्यान सोनूचा आणि तिच्या पोटातील सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. सोनू हिचा १२ जून २०२५ रोजी विनोद राठोड (वय २६) याच्यासोबत विवाह झाला होता. याप्रकरणी पती विनोद, सासू सुनीता राठोड (वय ४५), दीर विशाल राठोड (वय २४), काका सुभाष राठोड (वय ४५) आणि मावशी पिना राठोड (वय ३८, सर्व रा. मुकुंदवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Crime News: करवा चौथला मोठ्या भावाने आपल्या पत्नीला 'जोडवी' भेट दिल्याचा संशय; पतीने खलबत्त्याने चेचून केली हत्या

सोनूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ केला जात होता. एवढेच नव्हे, तर तिला जालन्यात नेऊन पतीसोबत घटस्फोटाचा बाँड करून घेण्यात आल्याचाही आरोप आहे. पतीकडून मारहाण सुरू असल्याने सोनूचे वडील तिला आपल्या घरी घेऊन आले होते.

त्या रात्री नेमकं काय घडलं?

‎‎कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पती विनोद तिला भेटण्यासाठी साताऱ्यातील आलोकनगर येथे माहेरी आला होता. रात्री उशिरापर्यंत दोघेजण बोलत बसले होते. साडेबाराच्या सुमारास विनोद तेथून निघून गेला. त्यानंतर तासाभरात पुन्हा तो सोनूच्या घरी आला. पहाटे चारच्या सुमारास सोनू आणि विनोद घराच्या गच्चीवर बोलत बसले होते. यादरम्यान त्यांच्यात भांडण झाले. सोनूने गच्चीवरून उडी मारली. सोनूने गच्चीवरून उडी मारल्याचे समजताच कुटुंबीयांनी तातडीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पती विनोद राठोड आणि सासू सुनीता राठोड यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दीर, मावसा आणि मावशी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा आरोप सोनूच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

crime news
Kolhapur Crime News: झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून खून; कौटुंबिक वादातून पत्नीचे कृत्य; इचलकरंजीतील घटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.