छत्रपती संभाजीनगर : शहर पोलीस लेखी परिक्षा ७ जुलैला

२१२ जागांसाठी २ हजार २२८ उमेदवार परिक्षा देणार
police written exam
छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई लेखी परिक्षा ७ जुलैला होणार आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिस शिपाई पदाच्या २१२ जागांसाठी १९ ते २६ जूनदरम्यान मैदानी चाचणी पार पडली. यातील १ जागेसाठी १० याप्रमाणे २ हजार २२८ उमदेवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची लेखी परीक्षा ७ जुलैला करोडी टोलनाक्याजवळील गुरुमाऊली वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली.

police written exam
पोलिस भरतीची ‘गर्दी’ काय सांगते?

लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची सामाजिक व समांतर आरक्षणासह गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी अनुसूचित जाती (एससी), विमुक्त भटक्या जमाती (व्हीजेए), भटक्या जमाती - ब (एनटी -बी), भटक्या जमाती - क (एनटी - सी), भटक्या जमाती - ड (एनटी- डी) या प्रवर्गाच्या जागा रिक्त नसतानाही त्यांनी मूळ प्रवर्गातून अर्ज केलेले आहेत. त्यांना अराखीव प्रवर्गाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून अराखीव प्रवर्गातून प्रवेश दिलेला आहे. त्यांना तसे लेखी परिक्षेपूर्वी बंधपत्र देणे आवश्यक आहे. बंधपत्र न दिल्यास भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्यात येईल, असेही नांदेडकर यांनी सांगितले.

police written exam
Police Recruitment | CCTV च्या निगराणीत बुधवारपासून पोलिस भरती; अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील मोबाईल वापरास बंदी

लेखी परीक्षेबाबत माहिती

  • परीक्षेचे ठिकाण : राम नवले यांचे गुरूमाऊली वेअर हाऊस, गट नं. १२९, करोडी टोलनाका, ओम साई हॉटेलच्या मागे, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग

  • परीक्षेची तारीख व वेळ : ७ जुलैला दुपारी ३ वाजता लेखी परीक्षा घेतली जाईल. मात्र, उमेदवारांना सकाळी साडेअकरा वाजता हजर रहावे लागेल.

  • उमेदवारांना लेखी परीक्षेकरीता परीक्षा पॅड व ब्लॅक पेन पुरविला जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र व आवेदन अर्ज सोबता आणावा.

  • उमेदवारांनी किंमती वस्तू, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच, मोबाइल, हेडफोन, ब्ल्युटूथ हेडफोन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत बाळगू नयेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news