Crime News : ड्रॉप बॉक्समधून धनादेश काढून परस्पर २ लाख हडपले

नावात फेरफार; केटरर्स व्यावसायिकाला गंडा; एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यासह भामट्यावर गुन्हा
Crime News
Crime News : ड्रॉप बॉक्समधून धनादेश काढून परस्पर २ लाख हडपलेpudhari photo
Published on
Updated on

Cheque removed from drop box; ₹2 lakh misappropriated

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये जमा केलेला दोन लाख रुपयांचा धनादेश परस्पर एका अनोळखी व्यक्तीला देऊन, त्या धनादेशावरील नावात फेरफार करत रोख रक्कम लाटल्याचा धक्कादायक प्रकार जुना मोंढा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत घडला आहे.

Crime News
Crime News : बनावट सहीने ९ लाख हडप; बुरखाधारी महिला जेरबंद

याप्रकरणी बँक कर्मचाऱ्याच्या संगनमतातून ही आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, क्रांती चौक पोलिस ठाण्यात बँक कर्मचारी आणि एका अनोळखी भामट्यावर मंगळवारी (दि.७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हरीष रामजी वर्मा (३७, रा. राजाबाजार, बांबू मार्केट) यांचा केटरर्सचा व्यवसाय आहे. त्यांना परिचयाच्या एका व्यक्तीकडून विवाह सोहळ्याच्या जेवणाची ६ लाख रुपयांची ऑर्डर मिळाली होती. त्या व्यवहारापोटी मिळालेला २ लाख रुपयांचा सारस्वत बँकेचा धनादेश वर्मा यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एसबीआयच्या जुना मोंढा शाखेतील ड्रॉप बॉक्समध्ये जमा केला होता. मात्र, काही दिवसांनंतरही रक्कम खात्यात जमा न झाल्याने त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी हा धनादेश २६ फेब्रुवारी रोजी सारस्वत बँकेतून कॅश झाल्याचे समोर आले.

Crime News
एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेवरच डल्ला; नांदेडमध्ये १ कोटी ९ लाखांचा महाघोटाळा

अशी उघडकीस आली फसवणूक :

वर्मा यांनी एसबीआय बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये चेकचा फोटो दाखवून एसबीआयचे कर्मचारी वाजेद शेख यांच्याकडून तो मूळ धनादेश परस्पर घेऊन गेल्याचे दिसले. विशेष म्हणजे बँक कर्मचाऱ्याने कोणतीही ओळख न तपासता हा धनादेश दिला होता.

नावात खाडाखोड करून उचलले पैसे

धनादेश नेल्यानंतर त्या अनोळखी भामट्याने सारस्वत बँकेत जाऊन मूळ धनादेशावरील 'वर्मा केटर्स' या नावात खाडाखोड करत ते 'वर्मा केटर्स नाला' असे केले. तसेच 'कटरेश नाला वर्मा' या बनावट नावाचे आधार कार्ड जोडून २ लाख रुपयांची रोकड बँकेतून लाटली. पुढील तपास उपनिरीक्षक रामकृष्ण काळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news