Sambhajinagar Crime News : विमानतळाच्या वॉच टॉवरजवळ ड्रोन सापडल्याने खळबळ

सुरक्षा यंत्रणा भेदून ड्रोन आत कसा ? अज्ञातावर एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime News
चिकलठाणा विमानतळावर आढळून आलेला ड्रोन.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : येथील चिकलठाणा विमानतळ परिसरात गुरुवारी (दि.9) सकाळी एका अज्ञात ड्रोनने मोठी खळबळ उडवून दिली. विमानतळाच्या वॉच टॉवर क्रमांक 7 जवळ झाडाझुडपांत हा ड्रोन पडलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी सुरक्षेचा भंग केल्याच्या संशयावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. दरम्यान, विमानतळाची सुरक्षा यंत्रणा भेदून ड्रोन परिसरात आलाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास विमानतळाच्या वॉच टॉवर क्रमांक 7 वरील सुरक्षा रक्षक संतोष बन्सी आव्हाड यांना कर्तव्यावर असताना झाडाझुडपात एक ड्रोन पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची माहिती सीआयएसएफचे पोलिस निरीक्षक धनंजय कुमार सिंह यांना दिली.

Sambhajinagar Crime News
Dombivli murder : डोंबिवलीत नळ चालू ठेवल्याचा जाब विचारल्याने हत्या

सिंह यांनी सहाय्यक उपनिरीक्षक नंदकुमार यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तिथे चंदेरी रंगाचा पॉवर फोल्डिंग फ्युजलेज (बशलेस) कंपनीचा ड्रोन जमिनीवर पडलेला आढळला. खबरदारीचा उपाय म्हणून सीआयएसएफच्या नियंत्रण कक्षाला कळवून तातडीने डॉग युनिटला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने तपासणी केल्यानंतर हा ड्रोन बंद स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. विमानतळ परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

Sambhajinagar Crime News
kidnapping Case : माजलगावात दिवसाढवळ्या दोन बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न

पोलिस आयुक्तांनी विमानतळ परिसरात ड्रोन उडवण्यास सक्त मनाई असल्याचे आदेश काढलेले आहेत. असे असतानाही एका अज्ञात व्यक्तीने सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ड्रोन उडवल्याने सीआयएसएफचे पोलिस निरीक्षक धनंजय कुमार सिंह यांच्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा ड्रोन नेमका कोणाचा आहे आणि तो इथे कसा आला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news