Police Uniform : पोलिसांचा फक्त बूट नव्हे, संपूर्ण गणवेश बदला

मुख्यमंत्री फडणवीस यांना खुले पत्र; बीपीआरडीच्या शिफारशींचा पुनरावलोकनासाठी समिती नियुक्त करा
Police Uniform
Police Uniform : पोलिसांचा फक्त बूट नव्हे, संपूर्ण गणवेश बदला File Photo
Published on
Updated on

Change the entire uniform of the police, not just their boots.

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगरः पोलिस दलाचा सध्याचा खाकी गणवेश हा आता कालबाह्य ठरला असून, तो आधुनिक, स्मार्ट आणि वर्क-फ्रेंडली करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत जालना पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मुद्देसूद असे खुले पत्र लिहिले आहे. केवळ बूट बदलून सुधारणा होणार नाही, तर संपूर्ण गणवेशात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, अशी मागणी केली आहे.

Police Uniform
Sambhajinagar Water Supply : शहराची २४ वर्षांची प्रतीक्षा संपणार, २५०० च्या जलवाहिनीतून डिसेंबरमध्ये पाणीपुरवठा

पत्रात नमूद केले आहे की, अभिनेते अक्षय कुमार यांनी पोलिसांच्या असुविधाजनक बुटांच्या समस्येकडे लक्ष वेधले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी, केवळ बुटांपुरते बदल मर्यादित ठेवणे योग्य नाही. पोलिसांचा गणवेश त्यांच्या जबाबदाऱ्या, हवामान, दीर्घ तासांची ड्यूटी, उपकरणे आणि धावपळीच्या स्वरूपाशी सुसंगत असला पाहिजे. महाराष्ट्राने या बदलात पुढाकार घेऊन देशात आदर्श निर्माण करावा.

मुख्यमंत्री फडणवीस यांना तज्ज्ञ समिती स्थापन करून बीपीआरडीच्या शिफारशींचा पुनरावलोकन करून महाराष्ट्रासाठी स्वतंत्र, आधुनिक आणि भारतीय ओळखीचा गणवेश लागू करण्याची मागणी केली आहे. पोलिसांचे मनोधैर्य आणि आत्मसन्मान वाढवण्यासाठी चांगल्या सुविधा जितक्या आवश्यक आहेत, तितकाच एक सुसंस्कृत, आधुनिक गणवेशही गरजेचा आहे. महाराष्ट्र पोलिसांना या कालबाह्य खाकीतून मुक्त करून नवी ओळख देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

Police Uniform
Sambhajinagar News : दोन वृद्ध महिलांच्या पिशवीसह गळ्यातील दागिने हिसकावले

ब्रिटिशकालीन गणवेशाची गरज संपली? खाकी गणवेश हा ब्रिटिश काळातील दडपशाहीची आठवण करून देणारा आहे. आज पोलिसांची भूमिका फोर्सपेक्षा सेवा देणारी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला साजेसा, आधुनिक आणि भारतीय अस्मितेला दर्शवणारा गणवेश आवश्यक आहे, असे पत्रात नमूद आहे.

स्मार्ट पोलिस गणवेश कसा असेल?

बीपीआरडीच्या अहवालानुसार नवीन गण-वेशासाठी हलका बेज शर्ट आणि गडद मातकट तपकिरी पॅन्ट, अँटी-बॅक्टेरियल, सुरकुत्या-मुक्त आणि हलके कापड, अँटी-स्किड बूट, आरामदायी बेल्ट, तसेच नवीन हवामानानुकूल टोपी व जॅकेट अशी वैशिष्ट्ये सुचवली आहेत. महिला पोलिसांसाठी झिपयुक्त आणि अधिक सोयीस्कर डिझाइनचा शर्टही प्रस्तावित आहे.

२०१७ मधील अहवाल धूळखात पडला

पत्रात त्यांनी ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआरडी) या केंद्र सरकारच्या संस्थेचा उल्लेख केला आहे. बीपीआरडीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी), अहमदाबाद यांच्या सहकायनि २०१७ मध्येच पोलिसांच्या गणवेशातील सुधारणा आणि डिझाइनबाबत सविस्तर अहवाल तयार केला होता. या अहवालात पोलिसांच्या कामाच्या स्वरूपानुसार ९ प्रकारचे स्मार्ट गणवेश डिझाईन्स सुचवले गेले होते, मात्र तो अहवाल आजही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे.

सध्याच्या गणवेशातील उणिवा

सध्याचे कापड जाड असून, उष्ण हवामानात गैरसोयीचे. मोबाईल, लाठी किंवा आवश्यक उपकरणे ठेवण्याची सोय नाही लेदरचे बूट जड आणि अस्वस्थ करणारे खाकी रंग रात्री दिसत नाही इतर अनेक विभागही खाकी गणवेश वापरत असल्याने पोलिसांची वेगळी ओळख राहिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news