Sambhajinagar Rain Alert : पुढील दोन दिवस धो-धो पावसाची शक्यता

शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.
 rain-forecast-for-two-days-in-Sambhajinagar
Sambhajinagar Rain Alert : पुढील दोन दिवस धो धो पावसाची शक्यताPudhari News Network
Published on
Updated on

Chance of heavy rain for the next two days

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरात पुढील दोन दिवस जोरदार वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

 rain-forecast-for-two-days-in-Sambhajinagar
सातारा गॅझेट महिनाभरात लागू न झाल्यास पुढच्या निवडणुकीत धुरळा उडवू : जरांगे

शहरासह परिसरातील अनेक भागांत सध्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र अधून मधून मध्यम ते जोरदार पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, कधी कडक ऊन पडत आहे. हा ऊन सावलीच्या खेळात दमट वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे.

 rain-forecast-for-two-days-in-Sambhajinagar
Sambhajinagar Crime : कुख्यात गुंड टिप्याची पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात हर्सूल जेलमध्ये रवानगी

वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.५) व शनिवारी (दि.६) असे सलग दोन दिवस छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्यातील अनेक भागांत वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सतर्कता बाळगण्याचे आवाहान करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news