Outram Ghat : औट्रम घाटात ५.५० कि.मी.च्या बोगद्याला केंद्रीय समितीची मंजुरी

२४३५ कोटी रुपयांचा खर्च येणार, ३ ऐवजी केवळ एकच बोगदा होणार
Outram Ghat
Outram Ghat : औट्रम घाटात ५.५० कि.मी.च्या बोगद्याला केंद्रीय समितीची मंजुरी File Photo
Published on
Updated on

Central Committee approves 5.50 km tunnel in Outram Ghat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर कन्नडच्या औट्रम घाटातील डोंगरात रेल्वेसह रस्ते वाहतुकीसाठी ३ बोगदे तयार करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. तूर्तास रेल्वेचा बोगदा रद्द झाल्याने या घाटात केवळ रस्ते वाहतुकीसाठी १४.८९ किलो मीटर अंतराच्या रस्त्यावर ५.५० किलो मीटर लांबीचा बोगदा होणार आहे. त्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलायमेंट अॅप्रुव्हल समितीने १५ दिवसांपूर्वीच मंजुरी दिली आहे. या कामासाठी २४३५ कोटी रुपयांचा खर्च लागेल, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिली.

Outram Ghat
Sambhajinagar News : हमीभावाची ऐशी की तैशी, सोयाबीन, कपाशीची हजार रुपये कमी दराने खरेदी

उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणारा कन्नडच्या औट्रम घाटातील बोगद्याचे काम मागील दोन दशकांपासून प्रलंबित आहे. या कामासाठी आतापर्यंत सतत सर्वेक्षण आणि केवळ चर्चाच सुरू होती. परंतु, मागील चार वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बो गद्याच्या कामाला प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. शहराचे माजी मंत्री खासदार डॉ. कराड यांनी त्यासाठी सतत पाठपुराव्यानंतर या बोगद्याला मंजुरी मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्राने या घाटात रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीचा देखील निर्णय घेतला होता. त्यासाठी औट्रम घाटात तीन बोगदे तयार करण्यात येईल, अशी घोषणा देखील केली होती.

परंतु, रेल्वे विभागाच्या सर्वेक्षणात बोगद्यातून अतिउताराचा मार्ग तयार होत असल्याचे आढळले. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी एकच बोगदा करण्यास अलाइनमेंट अॅप्नुव्हल समितीने मान्यता दिली. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया राबवून या कामाचे भूमिपूजन केले जाईल, असे खा. डॉ. कराड यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, कन्नड शहराध्यक्ष सुनील पवार, मनोज पवार, माजी जि.प. सदस्य किशोर पवार, कचरु घोडके यांची उपस्थिती होती.

Outram Ghat
Sambhajinagar Crime : एक को टपकाया, और दो को टपकाना है म्हणणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

तासी १०० किमीचा वेग

भोगद्यातून वाहनांसाठी तासी १०० औट्रम घाटात १४.८९ किलो मीटर लांबीचा रस्ता होणार असून त्या रस्त्यावर ५.५० किलोमीटर लांबीचा बोगदा राहणार आहे. या किलोमीटर वेग मार्यादा निश्चित केली आहे.

रेल्वे पुन्हा सर्वेक्षण करेल

औट्रम घाटात संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेसाठी पुन्हा तिसऱ्यांदा सर्वेक्षण केले जाईल. तसेच छत्रपती संभाजीनगर ते पुणे या रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार झाला असून लवकरच मंजुरी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news