

Campaign for a tree in the name of mother in the safari park
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड़ माँ के नाम या मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा येथील सफारी पार्कमध्ये २० हजार झाडे लवण्यात येत आहे. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अनिल मकरिये म्हणाले की, या उपक्रमामुळे शहराच्या पर्यावरणाचे संवर्धन तर होईलच, पण सफारी पार्कच्या रूपाने शहराच्या सौंदर्यातही मोठी भर पडणार आहे. शहरवासीयांना लवकरच अतियश सुंदर असे पर्यटन स्थळ उपलब्ध होणार आहे.
१३५ एकरच्या या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या उद्यानात इंडोरन्स कंपनीच्या सीएसआरमधून २० हजार झाडे लावण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. या पाहणी दौऱ्यात मनपा उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्मार्ट सिटीचे डेप्युटी सीईओ रवींद्र जोगदंड, प्रोजेक्ट मॅनेजर स्नेहा नायक आणि इंडोरन्स कंपनीचे गणेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, यासोबतच शहराच्या पार्किंग विषयावरही सभापती मकरिये यांनी बैठक घेतली. फुटपाथवरील अतिक्रमणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, यासाठी सतत अतिक्रमणांवर लक्ष ठेवून त्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी नागरी मित्र पथकाला दिले.