Crime News : एआयद्वारे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बनवून नशेसाठी गोळ्यांची खरेदी

मानसोपचार तज्ज्ञांच्या खोट्या शिक्क्यांचा वापर; १२ वी पास नशेखोराला बेड्या
Crime News
Crime News : एआयद्वारे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बनवून नशेसाठी गोळ्यांची खरेदीfile photo
Published on
Updated on

Buying drugs for addiction by making a doctor's prescription through AI

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात नशेखोरांना सहज औषधी, गोळ्या मिळत नसल्याने आता त्यांनी नवीन शक्कल लढल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ बारावी पास एका नशेखोराने चक्क 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (एआय) आणि मोबाईलमधील एडिटिंग अॅपचा वापर करून मानसोपचार तज्ज्ञांची बनावट वैद्यकीय चिठ्ठी तयार केली. या चिठ्ठीवर त्याने मेडिकलमधून नशेसाठी गोळ्या खरेदी केल्याचे प्रकार समोर आले. मात्र, काही डॉक्टरांना मेडिकल चालकांनी संपर्क करून माहिती दिल्यानंतर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

Crime News
Green Waste Project : मनपाचा ३५ कोटींचा ग्रीन वेस्ट प्रकल्प आठ वर्षांपासून बंदच

रजा सुलतान अब्दुल रहमान शेख (२५, रा. बायजीपुरा, संजयनगर) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती छावणी ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी दिली.

शहरातील एका मानसिक आरोग्य केंद्राचे प्रशासकीय अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ जूनपासून अनेक औषधी दुकानदारांचे त्यांना यांना कॉल येत होते की, रजा नावाचा एक तरुण रुग्णालयाच्या नावाने प्रतिबंधित औषधे खरेदी करत आहे. हा तरुण डॉक्टरांच्या नावाचा खोटा शिक्का, बनावट स्वाक्षरी आणि चुकीचा नोंदणी क्रमांक असलेली वैद्यकीय चिठ्ठी वापरत होता. ही औषधे अत्यंत गुंगी आणणारी असून, ती केवळ मानसिक रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाच दिली जातात.

हा गंभीर प्रकार समजल्यानंतर त्या बनावट चिठ्ठीची प्रत मिळवून संबधित मानसोपचार तज्ञांनी यावरील स्वाक्षरी आणि शिक्का पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तात्काळ छावणी ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच छावणी ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक डॉ. विवेक जाधव, उपनिरीक्षक सूर्यकांत शेंबाळे, हवालदार रवी देशमुख, राजू परचाके, शंकू दांडगे, राजू जाधव आणि पोळे यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Crime News
Nepal-Tibet Floods : नेपाळ घटनेत जिल्ह्यातील कोणीही अडकलेले नाही

मोबाईलवरच शिकला बनावटगिरी

आरोपी रजा शेख हा केवळ बारावी पास आहे. मात्र, इंटरनेटच्या माध्यमातून तो हे सर्व गैरप्रकार शिकला. एआय आणि मोबाईलमधील ऍपच्या माध्यमातून त्याने हुबेहूब मूळ चिठ्ठीसारखीच दिसणारी बनावट वैद्यकीय चिठ्ठी तयार केली होती. या चिठ्ठीच्या आधारे तो औषधी दुकानातून ३० रुपयांना मिळणारी नशेची गोळी खरेदी करत असे स्वतः नशेसाठी वापरून काही गोळ्या तो शहरातील नशेखोरांना ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकून कमाईही करत होता.

तलफ भागवण्यासाठी बनवला नवा मार्ग

गेल्या एक ते दीड वर्षांपासून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरात अमली पदार्थांच्या विरोधात अतिशय कडक आणि आक्रमक मोहीम राबवली आहे. अनेक मोठ्या तस्करांच्या टोळ्या उद्ध्वस्त करून त्यांना गजाआड केले. थेट परराज्यांतील मुख्य पुरवठादारांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या कारवायांमुळे शहरात नशेच्या गोळ्या आणि इतर अमली पदार्थ मिळणे कठीण झाले होते. दरम्यान, ड्रग्स तस्करांचे जाळे तुटले असले तरी, नशेखोरांनी आता असे नवे गुन्हेगारी मार्ग चोखळण्यास सुरुवात केली आहे, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news