Gangapur Robbery : गंगापुरात व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून दीड लाखांची लूट

गंगापूर-वैजापूर महामार्गावरील माऊली शिवारात भरदुपारी मोटारसायकलवरून आलेल्या तिघा भामट्यांनी मका व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून तब्बल १ लाख ५७ हजार रुपयांची रोकड लुटून नेली.
Gangapur Robbery
Gangapur Robbery : गंगापुरात व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून दीड लाखांची लूटfile photo
Published on: 
Updated on: 

Businessman robbed of Rs 1.5 lakh by throwing chilli powder in his eyes in Gangapur

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर-वैजापूर महामार्गावरील माऊली शिवारात भरदुपारी मोटारसायकलवरून आलेल्या तिघा भामट्यांनी मका व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून तब्बल १ लाख ५७ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी (दि. १६) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे तालुक्यातील व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Gangapur Robbery
Encroachment removal drive : शाक्यनगरमध्ये आठ बांधकामांवर हातोडा

माऊली उद्योग कमानीसमोर असलेल्या शिवार ट्रेडिंग कंपनीच्या केंद्रावर शंकरराव कारभारी सोनवणे यांचा मका खरेदीचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सोनवणे केंद्रावर असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी त्यांना गाठले. काही कळण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली.

डोळ्यांत मिरची पूड गेल्याने सोनवणे यांना दिसेनासे झाले आणि ते वेदनेने तडफडू लागले. याच संधीचा फायदा घेत भामट्यांनी सोनवणे यांच्या खिशातील बोलेरो वाहनाची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर एका आरोपीने वाहनाचा दरवाजा उघडून आतील १ लाख ५७ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

Gangapur Robbery
Sambhajinagar Crime News ; बाहेरगावी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे घर फोडून १८ तोळे सोने लंपास

चावी तिथेच फेकून देत तिघेही मोटारसायकलवरून धूम ठोकत पसार झाले. पोलीस कर्मचारी भागवत खाडे व मनोज आहेर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.