

Bus Schedule at Main Bus Stand Disrupted
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्य बसस्थानाकातून विविध मार्गावर सुटणाऱ्या अनेक बस वेळेवर धावत नाहीत. कधी चालक-वाहक उशिराने येत आहेत तर कधी बस वेळेवर मिळत नाही. अनेक दिवसांपासून येथून विविध ठिकाणी जाणाऱ्या बसचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. याकडे येथील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने दररोजच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्य बसस्थानकातून महत्त्वाच्या मार्गावर प्रवासी सेवा दिली जाते. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत अनेक मार्गांवरील बस नियमित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास किंवा त्यापेक्षाही जास्त काळाने त्या त्या मार्गावर सोडण्यात आल्या.
यासाठी कधी चालक वाहकांना झालेला उशीर तसेच जास्त करून बस उपलब्ध न राहणे, आगाराच्या बाहेर पडताच गाडी बंद पडणे आदी कारणे समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मुख्य आगारांतील देखभाल दुरुस्तीबाबत अनेकदा चालकांनी तक्रारी केल्या, परंतु त्याबाबत अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने ये रे माझ्या मागल्या असेच सुरू आहे.
गाडी गरम होण्यासह अनेक कारणे
अनेक मार्गावर आजही जुन्या असलेल्या लालपरी धावत आहेत. यांची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती होत नसल्याने त्या अर्ध्या रस्त्यातच बंद पडत आहेत तर अनेकदा बसस्थानकां बाहेर पडताच गाडी पुन्हा आगारात आणण्याची वेळ आली आहे. अशा घटना वारंवार घडत असतानाही अधिकारी मात्र याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेक चालकांनी केला आहे.
उत्पन्नावर परिणाम
विविध मार्गावर धावणाऱ्या बसचे वेळापत्रक हे त्या मार्गावरील प्रवाशांच्या आवाजाहीवरून ठरवण्यात आले आहे. अनेक मार्गावर जाणाऱ्या बस या वेळेत सोडण्यात येत नसल्याने त्या मार्गावरील उत्पन्नावर येणाऱ्या दिवसांत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. बस प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या वेळा साधूनच धावल्या तर अपेक्षित उत्पन्न येते, अशीही