Daulatabad Ghat Accident : दौलताबाद घाटात बस-दुचाकीची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

वळणावर घडला अपघात; जखमीवर उपचार सुरू
Daulatabad Ghat Accident
Daulatabad Ghat Accident : दौलताबाद घाटात बस-दुचाकीची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू file photo
Published on: 
Updated on: 

Bus and two-wheeler collide head-on in Daulatabad Ghat; one dead

दौलताबाद, पुढारी वृत्तसेवा : दौलताबाद ते खुलताबाद मार्गावरील दौलताबाद घाटात बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य एक युवक गंभीर जखमी झाला. जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (दि. २७) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मलिक हॉटेलसमोर हा अपघात झाला.

Daulatabad Ghat Accident
Corporator Disqualification Case : नगरसेवक अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचा आज दुसरा टप्पा

या अपघातात दुचाकीस्वार अक्षय साहेबराव दौंगे (वय ३०) यांचा मृत्यू झाला, तर अक्षय कारभारी बोडखे (वय ३३) हे गंभीर जखमी झाले. दोघेही मनूर (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बस (एमएच २० बीसी ३४३१) धुळे छत्रपती येथून संभाजीनगरच्या दिशेने येत होती. बसचे चालक मनोज पुजारी, तर वाहक गोकुळ डोगरे होते. बसमध्ये सुमारे ५० ते ५५ प्रवासी होते. दौलताबाद घाट उतरत असताना समोरून दुचाकीवरून अक्षय दौंगे व अक्षय बोडखे येत होते. मलिक हॉटेलसमोरील वळणावर बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे, पोलिस कर्मचारी दीपक मते यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेसह नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचीही मदत घेण्यात आली.

Daulatabad Ghat Accident
The all-new Audi Q-3 : संभाजीनगरात बनतेय 'ऑडी क्यू-३'

या अपघातात अक्षय दौंगे यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अक्षय बोडखे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे दौलताबाद घाट परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास दौलताबाद पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news