The all-new Audi Q-3 : संभाजीनगरात बनतेय 'ऑडी क्यू-३'

६ ऑक्टोबरला भारतात होणार लॉन्च
The all-new Audi Q-3
The all-new Audi Q-3 : संभाजीनगरात बनतेय 'ऑडी क्यू-३' file photo
Published on: 
Updated on: 

'Audi Q3' is being manufactured in Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी 'ऑडी'ने आपल्या बहुप्रतीक्षित 'ऑल-न्यू ऑडी क्यू-३' या नव्या मॉडेलची निर्मिती छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पात सुरू केली आहे. ही लक्झरी एसयूव्ही येत्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लॉन्च होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

The all-new Audi Q-3
Pitru Paksha : पितृपक्षात गिलके, अळूच्या पानांच्या मागणीत वाढ

उद्योनगरीतील शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील 'स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' प्लांटमध्ये ऑल-न्यू ऑडी क्यू-३' या नवीन लक्झरी कारची असेंब्ली सुरू आहे. यासंदर्भात स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पियुष अरोरा म्हणाले की, कंपनीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असून, ऑल-न्यू ऑडी क्यू ३ चे उत्पादन हे संभाजीनगर येथील प्रकल्पाच्या क्षमता अधोरेखित केल्याचे नमूद केले.

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर, बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले, ऑल-न्यू ऑडी क्यू ३ च्या लॉन्चच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत असून, यामुळे येथील औद्योगिक क्षेत्राला नवी गती मिळणार आहे. नव्या ऑडी क्यू-३मध्ये २.० लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

त्यासोबत ऑडीची प्रसिद्ध 'क्वात्रो ऑल-व्हील ड्राइव्ह' प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे कारच्या इंजिन क्षमतेसोबतच तिच्या ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावरही विशेष भर देण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर ही कार ऑडीच्या प्रीमियम एसयूव्ही श्रेणीतील महत्त्वाचे मॉडेल म्हणून पुढे येणार आहे.

The all-new Audi Q-3
Corporator Disqualification Case : नगरसेवक अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचा आज दुसरा टप्पा

औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक उद्योगांना नवी गती

जागतिक पातळीवरील लक्झरी ऑटोमोबाईल बँडच्या नव्या मॉडेलची निर्मिती शहरात होणे ही संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाची घटना आहे. येथील तांत्रिक कौशल्य आणि पायाभूत सुविधांमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लक्ष शहराकडे केंद्रित होत असून, यामुळे स्थानिक ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news