Ashadhi Ekadashi : प्रतिपंढरपुरात चोरांवर 'एआय' कॅमेऱ्यांची नजर; ४०० सीसीटीव्ही, ड्रोन सज्ज

पोलिसांचा तगडा बंदोबस्त; गोंधळ टाळण्यासाठी भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनाला सोडणार
Drones
Drones Pudhari
Published on
Updated on

Ashadhi Ekadashi : 'AI' cameras keep an eye on thieves in Pratipandharpur; 400 CCTV, drone ready

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज परिसरातील श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शहर पोलिसांच्या वतीने 'हायटेक' सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आणि भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी 'एआय' कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. गर्दीत शिरून चोऱ्या करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची पथके वारकऱ्यांच्या वेशात गस्त घालणार आहेत. दर्शनाच्या रांगेत गोंधळ टाळण्यासाठी भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सोडले जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.

Drones
Sambhajinagar News : ठरावाच्या दहा दिवसांनंतरही गुंठेवारी विभाग कर्मचाऱ्यांविना

अधिक माहितीनुसार, दर्शनाच्या रांगेत होणारा गोंधळ आणि चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून गतवर्षीपासून एका टप्प्यातील भाविकांचे दर्शन पूर्ण होईपर्यंत मागच्या टप्प्यातील भाविकांना थोडा वेळ थांबवून पुढे सोडले सोडण्याची पद्धती अवलंबण्यात येत आहे. तसेच कामगार चौक ते ओअॅसिस चौक आणि मंदिर परिसरात २ ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सातत्याने हवाई गस्त घातली जाणार आहे.

संपूर्ण मंदिर आणि यात्रा परिसरात तब्बल ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्यात आले असून, एका स्वतंत्र वाहनातून यावर लक्ष ठेवले जाणार आहे. याशिवाय एलईडी स्क्रीन व्हॅन, ४ वॉच टॉवर उभारण्यात आले असून, अधिकाऱ्यांना बॉडी कॅमेरे आणि गर्दीत सूचना देण्यासाठी हँड फ्री पीए सिस्टीम देण्यात आली आहे. आणीबाणीच्या प्रसंगी ३ अग्निशमन वाहनेही तैनात ठेवण्यात आली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मोकळ्या मैदानात तात्पुरती सुलभशौचालये उभारण्यात आली आहेत.

Drones
Crime News : आधी रिक्षा चोरली, मग चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

एआय कॅमेऱ्यामुळे चोरटा दिसताच मिळणार अलर्ट

यात्रेदरम्यान चोऱ्या आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक 'फेस रेकग्निशन' तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. रेकॉर्डवरील ३०० पेक्षा अधिक गुन्हेगारांची फोटोसह माहिती या 'एआय' कॅमेऱ्यांमध्ये फीड करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगार मंदिर परिसर किंवा गर्दीत दिसताच या कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांना तात्काळ अलर्ट मिळणार आहे.

स्कॅनरवरून कळणार पर्यायी मार्ग

ए. एस. क्लब सिग्रल ते कामगार चौक ही वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग समजण्यासाठी जागोजागी सूचना फलक आणि त्यावर क्यूआर स्कॅनर लावले आहेत. जेणेकरून स्कॅन करताच पर्यायी मार्ग सहज समजेल. प्रत्येक ब्लॉकिंग पॉइंटवर वाहतूक पोलिस तैनात असतील.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

यात्रेच्या बंदोबस्तासाठी १५ पोलिस निरीक्षक, ४० सहायक पोलिस निरीक्षक-उपनिरीक्षक आणि ५०० पुरुष व महिला पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एसआरपीएफ आणि होमगार्डची जादा कुमक तसेच स्थानिक स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.

तीन ठिकाणी पोलिस मदत केंद्र

गर्दीत लहान मुले, वयोवृद्ध नागरिक हरवल्यास किंवा ऐवज गहाळ झाल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी ओअॅसिस चौक, मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार (स्टेजजवळ) आणि कीर्तन मंडप या तीन ठिकाणी स्वतंत्र पोलिस मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

पोलिस आयुक्तांचे आवाहन आषाढी यात्रेनिमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. नागरिकांनी वृद्ध आणि बालकांची गर्दीत काळजी घ्यावी. मौल्यवान दागिने, मोबाईल सुरक्षित ठेवावेत. कोणतीही अडचण आल्यास किंवा संशयित हालचाली दिसताच तात्काळ जवळच्या पोलिस मदत केंद्राशी संपर्क साधावा.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news