Blinkit FDA action : 'ब्लिंकिट'ला एफडीएचा मोठा दणका

सातारा, हर्मूल येथील स्टोअर्सचे परवाने निलंबित; सिगारेटची बेकायदेशीर विक्री, मुदतबाह्य तूप, शौचालयासमोर अन्नपदार्थाची साठवणूक अन् अस्वच्छतेचा कहर
Blinkit FDA action
ब्लिंकिट स्टोअरवर असे शौचालयासमोरच अन्न व खाद्यपदार्थ उघड्यावरच ठेवल्याचे आढळून आले.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन अन्नपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या 'ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' (ब्लिंकिट) या कंपनीला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठा दणका दिला आहे. शहरातील सातारा आणि हसूल येथील ब्लिंकिटच्या २ ऑनलाईन अन्न साठवणूक व वितरण केंद्रांवर पथकाने केलेल्या अचानक तपासणीत खाद्यपदार्थांसोबत सिगारेटची विक्री, मुदतबाह्य तूप आणि शौचालयासमोर अन्नाची साठवणूक अन् अस्वच्छतेचा कहर आढळून आला. त्यामुळे या दोन्ही केंद्रांचे अन्न परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.

शहरातील सातारा परिसर हायकोर्ट कॉलनी येथील ब्लिंकिट केंद्रावर अन्नपदार्थांसह सिगारेटची ऑनलाईन विक्री सुरू होती. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे बंधनकारक असलेले पदार्थ उघड्यावर ठेवले होते.

Blinkit FDA action
Sambhajinagar vehicle fuel expenses : ईव्ही वाहनासाठी दरमहा महापौरांना ७६ हजार, उपमहापौरांना ५५ हजारांचा भत्ता

मुदत संपलेल्या तुपाचे प्लास्टिक जार नियमित विक्रीच्या साठ्यामध्ये ठेवले होते. शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले होते. तसेच अन्नपदार्थ आणि फिनाईल-साबण यांसारखे स्वच्छता साहित्य एकाच कप्प्यात ठेवले होते. कर्मचाऱ्यांची अस्वच्छता आणि अपुरी कागदपत्रे अशा अन्न सुरक्षेच्या गंभीर उल्लंघनामुळे सार्वजनिक आरोग्यास तातडीचा धोका निर्माण झाल्याने सहआयुक्त श्रीकांत करकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त द. वि. पाटील यांनी हे निलंबनाचे कडक आदेश जारी केले. अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे व कीर्तिका झाडे यांनी तपासणी केली.

शौचालयासमोर अन्नपदार्थ अन् उंदरांचा वावर

हसूल येथील ब्लिकिंटच्या गोदामाची अन्न सुरक्षा अधिकारी फरिद सिद्दीकी यांनी तपासणी केली असता चक्क शौचालयासमोरच कांदा, बटाटा आणि पिठाच्या रॅक्स ठेवले होते. तंबाखूच्या पिचकाऱ्या, तुटलेल्या पायऱ्या व फरशा, कचरा विखुरलेला होता आणि उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक रोडेन्ट ट्रॅप्स नव्हते. नोंदी व अहवालांचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेचा अहवालही नव्हता.

Blinkit FDA action
Hingoli Aundha Nagnath scam : औंढ्यातील अपहार प्रकरणात टोलवाटोलवी

डिलीव्हरी बंद, व्यवसाय केल्यास कायदेशीर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार, निलंबन कालावधीत ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडला किंवा त्यांच्या वतीने कोणालाही या दोन्ही केंद्रांवरून कोणत्याही अन्नपदार्थाची खरेदी, विक्री, साठवणूक किंवा 'ब्लिकिंट अॅप' द्वारे ऑनलाईन डिलिव्हरी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निलंबन काळात बेकायदेशीरपणे अन्न व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर गुन्हेगारी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news