राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे जोरदार आंदोलन

संसदेच्या मकरद्वारावर आंदोलन केल्याचा निषेध
BJP's strong protest against Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे जोरदार आंदोलनfile photo
Published on
Updated on

BJP's strong protest against Rahul Gandhi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या मकरद्वारावर बसून आंदोलन केल्याच्या घटनेचा निषेध करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी क्रांती चौकात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार निदर्शन करण्यात आली. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त करत हातात फलक घेऊन कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला.

BJP's strong protest against Rahul Gandhi
जि. प. अध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच !

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षातील खासदारांसह संसद भवनाच्या मकरद्वारावर बसून आंदोलन केले होते. या कृतीमुळे संसदीय परंपरेचा आणि लोकशाही संस्थेचा अपमान झाल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सकाळी शहरातही आंदोलन छेडण्यात आले.

क्रांती चौकात आयोजित या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरही टीका करत संसदीय परंपरा जपण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

BJP's strong protest against Rahul Gandhi
Leopard Attack : अंधारी शिवारातील शेतात बिबट्यांचा थरार

यावेळी महापौर समीर राजुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलनात महिला पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी नगरसेवक सुनील जगताप, रामेश्वर भादवे, रवी कावडे, मनोज गांगवे, गणेश नावंदर, राजू वाडेकर, अशोक दामले, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल दांडगे, विशाल सानप, सुनील बोराडे, निलेश धारकर, मंदीप राजपूत विशाल थोरात, सौरभम्हस्के यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थितीती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news