Sambhajinagar News : मनपाच्या प्रभाग रचनेवर भाजपचे वर्चस्व

शिंदे सेनेतून नाराजीचा सूर; सिडको हडकोत सर्वाधिक घोळ
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : मनपाच्या प्रभाग रचनेवर भाजपचे वर्चस्व File Photo
Published on
Updated on

BJP's dominance over the ward structure of the Municipal Corporation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : महापालिकेच्या प्रभाग रच-नेला शुक्रवारी रात्री उशिराने राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. त्यानंतर लागलीच रात्रीतून महापालिकेने त्यांच्या संकेत स्थळावर ही प्रभाग रचना प्रसिद्ध केली असून भाजपला पूरक ठरेल, अशीच प्रभाग रचना तयार केल्याची ओरड होत आहे. त्यावरून सध्या शिंदे सेनेतून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. प्रामुख्याने सिडको-हडकोवरूनही रोष असल्याची चर्चा आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Ganesh Mandal News : नवीन गणेश मंडळांना मनपाकडून तीन वर्षांची निःशुल्क परवानगी

महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रभाग रचना आपल्याला हवी तशी असावी, यासाठी प्रत्येक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यात शुक्रवारी मध्यरात्री महापालिकेने चार वॉर्डाचा एक प्रभाग यानुसार महापालिकेने तयार केलेली आणि राज्य शासन व निवडणूक आयोगाने मंजूर केलेली प्रभाग रचना नागरिकांच्या सूचना हरकतींसाठी प्रसिद्ध केली. या प्रभाग रचनेवरून राजकीय पक्षांमध्ये कहीं खुशी कहीं गमचे चित्र दिसून येत आहे. प्रामुख्याने शिंदे सेनेत या प्रभाग रचनेच्या ब्लॉग बदलावरून चांगलीच नाराजी दिसत आहे. शिव-सेना शिंदे गटाच्या वॉर्डामध्ये ज्या पद्धतीने बदल केला गेला, त्यावरून ही नाराजी आहे. हा प्रकार सर्वाधिक सिडको हडको येथील प्रभागांमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील काही प्रभागांमध्ये देखील तसे बदल झाल्याची चर्चा काही माजी नगरसेवकांमधून ऐकावसाय मिळत आहे. आपले जुने वॉर्डच नव्या प्रभागांमध्ये दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर काहींच्या वॉर्डातील विविध वसाहती इतर प्रभागात जोडण्यात आल्याने प्रभाग रचनेवर भाजपचा प्रभाव असल्याचा आरोप केला जात आहे.

एमआयएममधूनही संताप

महापालिकेने जी प्रभाग रचना तयार केली आहे. त्यात जुन्या वॉडांतील अनेक वसाहती गायब केल्या आहेत. वॉडाँचा प्रभागांमध्ये समावेश करताना त्याच्या सीमा ज्या पध्दतीने बदलल्या आहे. त्यामुळे आम्हाला आमचा जुना वॉर्ड कुठे आहे, हेच कळत नसल्याचे सांगत गणेश कॉलनी वॉर्डाचे उदाहरणदेखील एमआयएमचे माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news