जि.प.च्या सावंगी गटात भाजपच्या प्रचाराला वेग

आजिनाथ धामणे यांचा घरोघरी संपर्क
sambhajinagar news
जि.प.च्या सावंगी गटात भाजपच्या प्रचाराला वेगfile photo
Published on
Updated on

BJP's campaign gains momentum in Sawangi group of Z.P

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंगी गटात भारतीय जनता पक्षाच्या प्रच-वेग आला असून, पराला कार्यकर्त्यांच्या भक्कम संघटनशक्तीच्या जोरावर प्रचार प्रभावीपणे सुरू आहे. सावंगी गटाचे भाजपचे उमेदवार आजिनाथ धामणे यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

sambhajinagar news
Haribhau Bagade : राजकारणातील शालीनतेचा आदर्श गमावला

याप्रसंगी शनिवारी (दि.१) पिसादेवी गावासह परिसरात धामणे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. पदयात्रा व भेटीगाठींद्वारे त्यांनी स्थानिक प्रश्न जाणून घेत विकासाची दिशा स्पष्ट केली. यावेळी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकरी हित आणि महिला सबलीकरण या मूलभूत विषयांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करणार असल्याचा विश्वास देत धामणे यांनी मतदारांचा पाठिंबा मागितला.

sambhajinagar news
आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम वर्षातून दोनदा द्या

प्रचारादरम्यान कृष्णा सोटम, प्रभाकर काळे, मुंजाजी डीसले, निखिल धामणे, नाना धामणे, भरत जाधव, कल्याण धामणे, रमेश काळे, रतन काळे, कृष्णा काळे, मनोज जीवरक, राजेंद्र धामणे, फुलसिंग चव्हाण, कैलास हिवाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news