BJP protest : जेएनयूतील लैंगिक छळाच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी ; विद्यार्थिनींना न्याय देण्याची मागणी
BJP protest
BJP protest : जेएनयूतील लैंगिक छळाच्या निषेधार्थ भाजपची निदर्शनेfile photo
Published on: 
Updated on: 

BJP protests against sexual harassment at JNU

पुढारी वृत्तसेवा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) प्राध्यापक तथा काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजाम यांनी ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ केल्याचा आरोप करीत सोमवारी भाजप शहर व ग्रामीण कार्यकारिणी व महिला मोर्चाच्या वतीने क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच काँग्रेसविरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून टाकला.

BJP protest
Sambhajinagar News : तीन कोटींचा गंडा घालणाऱ्या एचआरच्या वडिलांसह भावाला बिहारमधून बेड्या

यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, महापौर समीर राजूरकर, सभापती अनिल मकरिये, महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा डॉ. उज्ज्वला दहिफळे आणि ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या गाडेकर यांच्यासह नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या आदेशानुसार आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. जेएनयूतील प्राध्यापक तथा काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्याशी संबंधित कथित प्रकरणावर काँग्रेस नेतृत्वाने मौन न बाळगता नैतिक जबाबदारी स्वीकारावी.

BJP protest
Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन द्या - शिक्षक समिती

तसेच संबंधित विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. महिलांचा सन्मान आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय असून, महिलांवरील अन्यायाच्या घटनांविरोधात आवाज उठविणे आवश्यक असल्याचे महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news