BJP MLA : भाजपचे आमदार, पदाधिकारी थेट बांधावर

सिल्लोड - सोयगावमधील शेतकऱ्यांशी संवाद, अडचणींची घेतली माहिती
BJP MLA
BJP MLA : भाजपचे आमदार, पदाधिकारी थेट बांधावरfile photo
Published on
Updated on

BJP MLAs, officials directly on the dam

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे यांनी सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील गावांना भेटी देत थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतीशी संबंधित माहिती जाणून घेतली.

BJP MLA
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण भरून देखील टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ

आ. राणे यांनी सिल्लोड तालुक्यातील आमसरी, लिहाखेडीला तर सोयगाव तालुक्यातील फर्दापूर, जरंडी या गावांना जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीक उत्पादन, वीजपुरवठा, शेती कर्ज तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभांबाबत चर्चा केली. शासनाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, वीज बिलाबाबत घेतलेले निर्णय तसेच महायुती सरकारच्या शेतकरी हिताच्या विविध योजनांबाबत त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना माहिती दिली.

शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना यावेळी केले. यावेळी सिल्लोड - सोयगाव विधानसभा प्रमुख सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, संयोजक किरण पाटील, माजी आ. सांडू पा. लोखंडे, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे, डॉ. सचिन वाघ, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विजय वानखेडे, उत्तम चव्हाण, मंडळाध्यक्ष आत्माराम पाडळे, एकनाथ हिवाळे, मनोज मोरेल्लु, भाजपा सोयगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, माजी उपसभापती अरुण काळे, चेअरमन अशोक साखळे, अनिल खरात, गजानन जाधव, सुनील गांवडे, जयप्रकाश चव्हाण, विलास काळे, कैलास जंजाळ, हरिदास साखळे, विनोद चव्हाण, नामदेव साखळे, रमेश जाधव, ज्ञानेश्वर इंगळे, दीपक काळात्रे, सुनील बावस्कर, गणेश बावस्कर आदी पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते.

BJP MLA
Vaijapur News : मुदतबाह्य बिस्किटे अधिकाऱ्याच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न

शेतकरी हिताचे निर्णय

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून संवाद, समस्या जाणून घेऊन समाधानाचा आमचा प्रयत्न आहे. या भूमिकेतून हा संवाद आयोजित करण्यात आला असून थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन अडचणी जाणून घेत आहोत. केंद्र व राज्यातील सरकार शेतकरी हिताचे आहे. सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे आ. राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news