Vaijapur News : मुदतबाह्य बिस्किटे अधिकाऱ्याच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न

वैजापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Vaijapur News
Vaijapur News : मुदतबाह्य बिस्किटे अधिकाऱ्याच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्नFile Photo
Published on
Updated on

Attempting to cram expired biscuits into the officer's mouth

वैजापूर, पुढारी वृत्तसेवाः अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला अडवून मारहाणीची धमकी देत, जप्त केलेली मुदतबाह्य बिस्किटे जबरदस्तीने तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील गंगापूर चौफुली येथे २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.

Vaijapur News
Land Acquisition : ऑरिकसाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

याप्रकरणी नितीन उर्फ मिथुन बहिरट (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यासह शिवा ठोंबरे व दिनकर रोठे (दोघे रा. पुरणगाव, ता. वैजापूर) या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर (रा. कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी त्यांनी एका ठिकाणाहून मुदतबाह्य बिस्किटांच्या पाकिटांवर कारवाई करून ती जप्त केली होती. आरोपींनी संगनमत करून शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अजिंठेकर यांना अडवले. तसेच मारहाणीची धमकी देत बळाचा वापर केला.

Vaijapur News
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण भरून देखील टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ

आरोपींनी जप्त केलेल्या बिस्किटांच्या पाकिटांवरील लेबल फाडले आणि अधिकाऱ्याला मारहाणीची धमकी देत मुदतबाह्य बिस्किटे जबरदस्तीने त्यांच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news