knife attack : एमआयटी कॉलेजमध्ये भाईगिरी... अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

आम्ही म्हणतो तसेच वागावे लागेल म्हणत हल्ला, १७ वर्षीय मुलाचे तळहात चिरले, एकाच्या मांडीवर वार
knife attack
knife attack : एमआयटी कॉलेजमध्ये भाईगिरी... अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्लाfile photo
Published on: 
Updated on: 

'Bhai-giri' at MIT College... Engineering student attacked with a knife

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एमआयटी कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांवर दहशत माजवत भाईगिरी करणाऱ्या टवाळखोरांनी प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये राहायचे असेल तर आम्ही म्हणतो तसेच वागावे लागेल, असा दम भरून बेदम मारहाण केली. वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या विद्यार्थ्याच्या मावस भावावर आणि मामावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

knife attack
Unauthorized Hoardings : महापौरांच्या आवाहनालाच महानाट्य आयोजकाकडून हरताळ ?

ही घटना मंगळवारी (दि. २७) दुपारी १ वाजेच्या सुमारास एमआयटी कॉलेजच्या मंथन हॉलसमोर घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल चव्हाण, करण सरोदे आणि अनोळखी एकजण अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी प्रणव नरवडे (१८, रा. उस्मानपुरा) याच्या तक्रारीनुसार, तो एमआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकल बी.टेक.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर तो त्याचे मित्र मयुर दाभाडे आणि मानव नरवडे यांच्यासोबत घराकडे निघाला होता. ते मंथन हॉलसमोर पोहोचताच आरोपी करण सरोदे हा अचानक त्यांच्यासमोर आला.

knife attack
Rangin Darwaja : सहा महिन्यांपासून रंगीन दरवाजाच्या दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाची पाठ

तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहात? तुम्हाला काहीच माहीत नाही मी कोण आहे ते, तू जास्त शिल्लकचे कशाला बोलतोस ? तुम्हाला या कॉलेजमध्ये राहायचे असेल, तर आम्ही म्हणतो तसेच वागावे लागेल, असा थेट दम भरत करणने प्रणवला शिवीगाळ केली. त्यानंतर करणने फोन करून त्याचा साथीदार अमोल चव्हाण याला तेथे बोलावून घेतले आणि दोघांनी मिळून प्रणवला बेदम मारहाण सुरू केली.

तेव्हा अल्पवयीन मावस भावाने धैर्याने अमोलचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी चव्हाण याने त्याच्या दोन्ही हातांवर चाकूने वार केले, ज्यामुळे तळहात खोलवर चिरले जाऊन तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर मामा विकी त्रिभुवन यांच्या उजव्या मांडीवर आणि डाव्या हातावर चाकू मारून त्यांनाही गंभीर जखमी केले. हल्लेखोरांनी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत पळ काढला. पुढील तपास हवालदार संतोष जाधव करत आहेत.

मध्यस्थी करायला गेले अन् आरोपीने काढला चाकू

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या प्रणवने बचावासाठी त्याचे मामा विकी त्रिभुवन आणि १७ वर्षीय मावस भावाला फोन करून कॉलेजजवळ बोलावून घेतले. ते दोघे कॉलेजसमोर पोहोचले आणि त्यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मुलांमधील वाद वाढवू नका, असे सांगत असतानाच संतापलेल्या अमोल चव्हाण याने कमरेचा चाकू बाहेर काढला आणि थेट प्रणववर वार करण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.