बीडच्या महिला मंडळ अधिकाऱ्याला अश्लील मेसेज अन् मुलीला जीवे मारण्याची धमकी

पैठणमधील 'या' राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
Woman Assault
Woman AssaultPudhari
Published on
Updated on

पैठण : "तू बीड जिल्ह्याची रहिवासी आहेस, म्हणून माझे महसूल विभागातील काम करत नाहीस," असा संताप व्यक्त करत एका महिला मंडळ अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणे आणि तिच्या मुलीला 'नसरापूर' प्रकरणासारखे हाल करून मारून टाकण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पैठण तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पैठण महसूल विभागांतर्गत विहामांडवा येथे गेल्या आठ महिन्यांपासून एक महिला मंडळ अधिकारी कार्यरत आहेत. पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता युवराज चावरे (रा. कोळीबोडखा, ता. पैठण) याने "माझे महसूलचे काम का करत नाहीस?" अशी विचारणा करत महिला अधिकाऱ्याला त्रास देण्यास सुरुवात केली.

Woman Assault
Women workplace safety | प्रश्न महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षिततेचा

संशयित आरोपी युवराज चावरे याने महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर रात्रीच्या वेळी अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले. त्यातील काही मेसेज नंतर त्याने डिलीटही केले. एवढ्यावरच न थांबता, त्याने महिला अधिकाऱ्याच्या घराचा संपूर्ण पत्ता शोधून काढला. "तुझी मुलगी घरी एकटीच असते, तिचे मी नसरापूर प्रकरणासारखे हाल करून तिला मारून टाकीन आणि तुलाही गायब करीन," अशी थेट धमकी त्याने दिली.

Woman Assault
Chhatrapati Sambhajinagar | एलसीबीतील साहेबांचा जाच; महिला पोलिसाचे जीवन संपवण्याबद्दलचे स्टेट्स

पीडित महिला अधिकाऱ्याची पोलिसांत धावसंशयित आरोपीच्या या सततच्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडित महिला मंडळ अधिकाऱ्याने पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी शुक्रवारी (दि. १५) या छळाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.

Woman Assault
कामगार मंडळातील महिला अधिकाऱ्याला शंभर रुपयांच्या लाचेसाठी 'एसीबीचा' जाळ्यात अडकली

पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू

महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी आरोपी युवराज चावरे याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पुढील तपास सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राम बाराहाते हे करीत आहेत. एका महिला शासकीय अधिकाऱ्याला अशा प्रकारे धमकी दिल्याने पैठण आणि बीड महसूल विभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news