Sambhajinagar Crime : बसस्थानकात पकडलेल्या चोराकडून साडेचार तोळ्यांच्या बांगड्या जप्त

मध्यवर्ती बसस्थानकात महिलेच्या हातातील साडेचार तोळ्यांच्या बांगड्या चोरताना नागरिकांनी सुरज सुरेश टिंगडे (३४, फडके रोड, ठाणे) याला पकडून क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : बसस्थानकात पकडलेल्या चोराकडून साडेचार तोळ्यांच्या बांगड्या जप्त File Photo
Published on
Updated on

Bangles worth four and a half tolas seized from thief caught at bus stand

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मध्यवर्ती बसस्थानकात महिलेच्या हातातील साडेचार तोळ्यांच्या बांगड्या चोरताना नागरिकांनी सुरज सुरेश टिंगडे (३४, फडके रोड, ठाणे) याला पकडून क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर दोन साथीदार अडीच तोळ्यांची बागडी घेऊन पसार झाले होते. दरम्यान, क्रांती चौक पोलिसांनी सुरजकडूनच तपासात दोन्ही बांगड्या हस्तगत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी शुक्रवारी (दि.१०) दिली.

Sambhajinagar Crime
Railways housefull : दिवाळीनिमित्त विविध मार्गांवरील रेल्वे हाऊसफुल्ल

फिर्यादी लताबाई कारभारी गायकवाड (६५, रा. हिवरखेडा, ता. कन्नड) यांच्या तक्रारीनुसार, त्या रविवारी (दि.५) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या भाचीसह चाळीसगावकडे जाणारी बस पकडत होत्या. त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या काही तरुणांनी त्यांच्या हातातील पाटल्या कटरने कापून चोरल्या होत्या. तेव्हा नागरिकांनी सूरजला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

तेव्हा एकच बांगडी त्याच्याकडे होती, मात्र दुसरी बांगडी त्याचे दोन साथीदार घेऊन पळून गेल्याची नोंद गुन्ह्यात होती. पोलिसांनी तपासात अंबरनाथ येथे जाऊन दुसरी बांगडीही जप्त केली. मात्र दोन्ही साथीदार हाती लागले नाहीत. त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, एसीपी सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील माने, उपनिरीक्षक उत्तम जाधव, विरेश बने, धनपाल लोखंडे, रवी खरात, देविदास खेडकर यांनी केली.

Sambhajinagar Crime
Sambhajinagar News : भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा ४४ लाखांचा साठा जप्त

बार गर्ल्सला ने-आण करण्याचे काम

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी सुरज हा मुंबईत टॅक्सी चालवितो. बारमध्ये काम करणाऱ्या तरुणींना अंबरनाथ ते उल्हासनगर अशी दररोज ने-आण करण्याचे त्याच्याकडे काम होते. मात्र नवरात्रीमुळे तरुणी बंगालला निघून गेल्याने त्या काळात त्याच्याकडे काम नव्हते. काही मित्रांनी त्याला पैसे कमाऊ म्हणून येथे सोबत आणले होते. त्याच्या दोन मित्रांनी बसस्थानकातून बांगड्या चोरल्या मात्र पाळताना तो नागरिकांच्या तावडीत सापडला. अन्य मित्र पसार झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news