BAMU recruitment : प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

जुन्या उमेदवारांना एटीआर भरावा लागणार
BAMU faculty recruitment
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ प्राध्यापकांची भरती File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी राज्य शासनाच्या नवीन नियमावली, कार्यपध्दतीप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यापुर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने एटीआर भरावा लागणार असून, नवीन उमेदवारांनाही अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील विद्यापीठातील अध्यापकांच्या निवड प्रक्रिया राबविण्याबाबत सार्वजनिक राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यपध्दती संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला. यानुसार एटीआर भरण्यासंदर्भात निश्चिती करण्यात आली. ६०: २०: २० या प्रमाणे अकॅडमिक रेकॉर्ड, अध्यापन कौशल्ये व मुलाखत, असे प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

BAMU faculty recruitment
Buldhana News : सेवानगरात मिरची पिकाच्या बीजोत्पादनाला मिळाली चालना

शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील जागांचा समावेश आहे. यामध्ये मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, आंतरविद्याशाखा व विज्ञान तंत्रज्ञान या चारही विद्याशाखांतील जागांचा समावेश ५३ आहे. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातील आठ, तर सहयोगी प्राध्यापक पदाच्या १२ जागांचा समावेश आहे. तर सहाय्यक प्राध्यापकांच्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या जागांसाठी केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलच्या माध्यमातून २६ फेब्रुवारी ते १२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर १८ मार्चपर्यंत आस्थापना विभागात दोन प्रतीत हार्ड कॉपी दाखल करता येणार आहे. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

BAMU faculty recruitment
Illegal sand mining : भुवन वाळूघाट,अवैध उत्खनन

यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये अर्ज दाखल केलेल्यांना नव्याने एटीआर भरावा लागणार होता. त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तर या सर्व पदांसाठी नवीन उमेदवारांनाही अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. जाहिरातीतील एकूण पदे, आरक्षण, शुल्क व अन्य माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news