

छत्रपती संभाजीनगर : ऑटो एलपीजीचा तुटवडा आणि भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या शहरातील रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. युद्धापूर्वी ६० ते ९० रुपये दराने मिळणार गॅस १२० रुपये लिटरपर्यंत गेला होता. मात्र आता गो गॅसने आपले दर १२० रुपयांवरून ९९ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आणले आहेत, शिवाय शहरातील पंपांवर ऑटो एलपीजी पुरेशा प्रमाणावर उपलब्धही झाला आहे.
एलपीजी ऑटो गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालक असोसिएशन आक्रमक झाली होती. संघटनांकडून प्रशासनाला निवेदनाने देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरात एलपीजीचा मोठा साठा दाखल झाला. यामुळे चालकांची अडचण बऱ्याच अंशी कमी होणार आहे. यातच वधारले दर देखील मंगळवार, ५ मेपासून खाली आले आहेत. आतपर्यंत १२० रुपयांपर्यंत वाढलेले दर आता ९९ रुपये पत्री लिटरपर्यंत ओसरले आहेत.
सोमवारी शहरात एलपीजीचा मोठा स्टॉक दाखल झाल्याने रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला. हा स्टॉक शहरातील मगो गॅसफच्या चार स्टेशन्सवर वितरित करण्यात आला आहे. शहरातील गो गॅस असलेल्या चार पंपांसाठी हा गॅस उपलब्ध करण्यात आला आहे. यात कांचनवाडी एलपीजी स्टेशनसाठी ९ हजार लिटर, बीड बायपास स्टेशनसाठी ९ हजार लिटर गॅस उपलब्ध करण्यात आला आहे. तर चिकलठाणा आणि साऊथ सिटी पंपांसाठीदेखील पुरेसा गॅस साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
२१ रुपयांनी दर घसरले
युद्धापूर्वी एलपीजी ६० ते ८० रुपये प्रति लिटर दराने मिळत होता. मात्र युद्धामुळे झालेल्या तुटवड्यामुळे याचे दर वाढले. काही पंपांवर १२० रुपयांपर्यंत एलपीजी विक्री होत आहे. दरम्यान, गो गॅसने निर्णय घेत मंगळवार, ५ मे पासून दर आणस्वी स्वाली आणले आहेत. आता ९९ रुपये प्रति लिटर दराने हा गॅस उपलब्ध झाला.