Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नसमारंभात आला, पैसे- मोबाईल असलेली पर्स चोरून पळाला; घटना CCTV मध्ये कैद

Chhatrapati Sambhajinagar Theft | छत्रपती संभाजीनगरात एका लग्नसमारंभादरम्यान चोरट्याने पैसे आणि मोबाईल फोन असलेली पर्स लंपास केल्याची घटना समोर आली असून, हा प्रकार संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Theft Case

छत्रपती संभाजीनगरात एका लग्नसमारंभादरम्यान चोरट्याने पैसे आणि मोबाईल फोन असलेली पर्स लंपास केल्याची घटना समोर आली असून, हा प्रकार संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. सुतगिरणी चौक परिसरातील जानकी बँक्वेट हॉलमध्ये विवाहसोहळा सुरू असताना ही चोरी झाल्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.

Theft
Kadsiddheshwar Swami | घडलेल्या प्रसंगावर काडसिद्धेश्वर महाराजांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले...

हर्ष रविंद्र भावसार यांच्या आईची पर्स या चोरट्याने अत्यंत शिताफीने पळवली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती हॉलमध्ये अगदी सहजपणे प्रवेश करतो आणि आसपास निरीक्षण करत योग्य वेळ पाहून पर्स उचलून हळूच बाहेर जातो. चोरी झालेल्या पर्समध्ये दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम मिळून सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

घटनेनंतर भावसार यांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्याचा शोध सुरू केला आहे. फुटेजमध्ये चोरट्याचे हालचाली स्पष्ट दिसत असल्याने त्याचा शोध घेण्यास मदत होईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.

Theft
Run for Heritage : रन फॉर हेरिटेजमध्ये ११०० धावपटूंचा सहभाग

अशा प्रकारे लग्नसमारंभासारख्या आनंदाच्या वातावरणातही चोरटे संधी शोधत असतात आणि काही क्षणातच पर्स किंवा मौल्यवान वस्तू लंपास करतात. त्यामुळे कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिसांची पथके विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरटा लवकरच सापडेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की लग्नसोहळे, सत्कार किंवा मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये चोरटे वारंवार सक्रिय असतात. त्यामुळे आयोजकांनी आणि नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षा उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news