Jaltara : जिल्ह्यात प्रत्येक गावात जलताराची १०० कामे

जिल्हाधिकारी गौडा यांचा निर्णय, तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
Jaltara
Jaltara : जिल्ह्यात प्रत्येक गावात जलताराची १०० कामेfile photo
Published on: 
Updated on: 

100 'Jaltara' (water-related) projects in every village in the district

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन उपलब्ध जलस्रोतांचे बळकटीकरण करा. त्यासोबतच मृद व जलसंधारण विभागाकडून प्रत्येक गावात १०० जलतारा कामांचे नियोजन करून त्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश सोमवारी (दि. १९) जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले. गावनिहाय गरजा निश्चित करून जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Jaltara
Sambhajinagar News : शहरातील पाण्याची नासाडी रोखण्याचे आव्हान

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपजिल्हाधिकारी रूपेश शिंगारे, कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके यांच्यासह संबंधित अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील कमी पावसाअभावी निर्माण होणाऱ्या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी आतापासूनच जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी नियोजनावर भर दिले आहे.

त्याअंतर्गत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मृद व जलसंधारण विभागाच्या कामांचा तसेच दुष्काळसदृश परिस्थितीवरील उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना आवश्यक सूचना दिल्या. प्रत्येक गावाची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध जलस्रोत आणि जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर स्थानिक गरजा लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे.

Jaltara
Sambhajinagar News : सातारातील नागरिकांना लवकरच होणार पाणीपुरवठा

यासाठी संबंधित विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचेही त्यांनी सुचविले. दरम्यान, प्रत्येक गावांमध्ये जलताराचे किमान १०० कामे करण्याचे नियोजन आहे. यात शेताच्या कडेला ५ बाय ५ फुटांचे खड्डे केले जाणार आहे. हे खड्डे उतार पाहून करण्यात येणार आहेत. त्यात दगड टाकण्यात येतील. जलतारा कामांचे प्रलंबित प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यतेची स्थिती तपासावी. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याच्या शक्यता पडताळाव्यात, तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

२३७ गावांतील कामे पूर्ण

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३०२ गावांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यापैकी २३७गावांतील कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचा आतापर्यंत ३ हजार ३१४ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून पाझर तलावांमधील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news