Ashadhi Wari : नाथांच्या पादुकांचा आज होळे येथे भीमा स्नान सोहळा

१७ वा मुक्काम पूर्ण करून सोहळा आषाढी वारीसाठी पंढरीतील वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होणार
Ashadhi Wari
Ashadhi Wari : नाथांच्या पादुकांचा आज होळे येथे भीमा स्नान सोहळाfile photo
Published on
Updated on

Ashadhi Wari: Ritual bath ceremony of Saint Eknath's *Padukas* in the Bhima River at Hole today

पैठण, पुढारी वृत्तसेवा : "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे हेचि घडो मज जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव" श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पादुकांचा भीमा स्नान सोहळा आज शुक्रवारी (दि. २४) सकाळी भीमा नदीच्या तीरावर होळे (ता. पंढरपूर) येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याची तयारी परिसरातील भाविकांनी मोठ्या उत्साहात केली आहे.

Ashadhi Wari
Accident News : आखतवाडा फाट्याजवळ धावत्या स्कॉर्पिओला आग

सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पंढरीनगरीमध्ये वैष्णवाच्या मेळ्यात सहभाग असण्याचा ४२७ वर्षांच्या परंपरेनुसार मोठा मान श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळ्याचा असतो. या आषाढी वारी सोहळ्यासाठी नाथांची पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, अ ँड. योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जुलै रोजी पैठणनगरीतून मोठ्या उत्साहात छोट्या मोठ्या ४० दिंड्यांसह तीस हजार वारकऱ्यांच्या सहभागातून हा सोहळा निघाला आहे.

पहिला मुक्काम चनकवाडी, हादगाव, कुंडल पारगाव (भगवान गडाच्या पायथ्याशी), मुंगसवाडे, राक्षस भवन (तांबे), रायमोह, पाटोदा, दिघोळ, खर्डा, दांडेगाव, अनाळे, बिटरगाव, कुई, अरण, करकंब येथील भानुदास एकनाथ जयघोषात वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत १७मुक्काम मोठ्या उत्साहात पूर्ण करून सोहळा शेवटच्या मुक्कामासाठी होळे (ता. पंढरपूर) भीमा नदीच्या तीरावर दाखल झाला.

Ashadhi Wari
Sambhajinagar News : ट्रक-पिकअपची समोरासमोर धडक

शुक्रवारी सकाळी श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पादुकांची भीमा स्नान सोहळा मोठ्या उत्साहात होळे येथे संपन्न होणार आहे. परिसरातील भाविकांनी व सरपंच मधू भुसनर, अण्णा महाराज भुसनर, बाप्पा बुसनर, अनिल क्षीरसागर, विठ्ठल गळगे यांनी स्नान सोहळ्याची जय्यत तयारी केली.

दुपारी शिराढोण पंचक्रोशीतून सोहळा वाखरी येथील प्रमुख सोहळ्यात सहभागी होणार आहे. यावेळी नाथांच्या पादुकांचे पूजन आरती करून उभे रिंगण पार पडणार आहे. रात्री उशिरा मिरवणुकीद्वारे नाथांच्या पादुका सोहळाचा पंढरपूर येथील नाथ चौकातील श्रीसंत एकनाथ महाराज मंदिरात विसावा राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news