Waluj Pandharpur yatra : छोट्या पंढरपूर यात्रेवर ६५ कॅमेऱ्यांची राहणार नजर

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; ८५५ ठिकाणी ३४२० स्वयंसेवक लागणार; परिसरात १३ ठिकाणी स्टॉल
Waluj Pandharpur yatra
छोट्या पंढरपूर यात्रेच्या तयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. सोबत सीईओ मिन्नू पी.एम., उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते आणि इतर अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील छोटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाळूज पंढरपूरमध्ये दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त मराठवाड्यातील भाविक लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप येते.

या यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून विविध ६५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासोबतच स्वच्छ वारी उपक्रमासोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी ८५५ ठिकाणी ३,४२० स्वयंसेवक सज्ज केले जाणार आहेत. तसे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी सोमवारी (दि.२०) झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

Waluj Pandharpur yatra
Chhatrapati Sambhajinagar rainfall : जुलैमध्ये २० पैकी १० दिवसच पडला पाऊस

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती मस्के, मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, अन्न औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी छोट्या पंढरपूरमध्ये मराठवाड्यातून वारकऱ्यांच्या दिंडींचे आगमन होते. त्यासोबतच मोठ्या पंढरपूरमध्ये जाणे शक्य होत नसलेले अनेक भाविक छोट्या पंढरपूरमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे मोठ्याप्रमाणात मंदिर परिसरात गर्दी होते. त्यात महावीर चौक ते नगरनाका आणि पुढे वाळूजपर्यंत ठिकठिकाणी फराळ वाटपाचे स्टॉल उभारलेले असतात.

Waluj Pandharpur yatra
Chhatrapati Sambhajinagar protest : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा एल्गार

मंदिर परिसरातही १३ ठिकाणी स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या प्रत्येक स्टॉल्सवर स्वयंसेवक उपलब्ध असावे. दरम्यान, वारीमध्ये स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. कचरा संकलनासाठी कचराकुंडी उपलब्ध असावी. भाविकांनी इतरत्र टाकलेला कचरा उचलण्यासाठी स्वच्छता स्वयंसेवक, सफाई कर्मचारी यांना नेमण्यात यावे. घंटागाड्यांची उपलब्धता व कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची उपलब्धता ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news