Marathwada Crime : उद्योजकाला डेंग्यू होताच दोघांनी भागीदारातील कंपन्या हडपल्या

३१ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा
Marathwada Crime
Marathwada Crime : उद्योजकाला डेंग्यू होताच दोघांनी भागीदारातील कंपन्या हडपल्याFile Photo
Published on
Updated on

As soon as the entrepreneur got dengue, the two grabbed the companies of their partners

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उद्योजकाला डेंग्यू झाल्यानंतर त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत खरेदी करण्यात आलेल्या दोन कंपन्या दोन भागीदारांनी हडप केल्या. बनावट कागदपत्रे, स्वाक्षरी वापरून १०० टक्के शेअर्स नावे करण्यासाठी पुण्याच्या व्हॅस्कॉन कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापकाने त्यांना साथ दिली. सात जणांनी मिळून उद्योजकाला तब्बल ३० कोटी ८१ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार २०२० ते ३१ मार्च २०२५ या काळात एसटीपीआय, चिकलठाणा येथे घडला.

Marathwada Crime
Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर; ४४ मंडळांमध्ये अतिवृष्टी

राजू मानसिंग राठोड, संजय हरिश्चंद्र फोके (दोघे रा. मिलेनियम पार्क, एमआयडीसी चिकलठाणा), सोमनाथ विश्वास, शिवप्रकाश नायर, मन्सूर दलाल (तिघे रा. पुणे), व्हॅस्कॉन कंपनीचे पदाधिकारी व इतर आणि कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापक (सिडको एन-५) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी गोपाल त्रिलोकचंद अग्रवाल (४७, रा. एस टी पी आय, चिकलठाणा) यांच्या तक्रारीनुसार, ते रिद्धी सिद्धी कॉटेक्स, त्री फायबर्स दोन्ही कंपनीचे संचालक असून, सिद्धी फायबर्स, रामानूज कॉटन कॉर्पोरेशन या संस्थेचे भागीदारही आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय एसटीपीआय चिकलठाणा येथे असून, भारतभर ते कपासासंबंधी व्यवसाय दलालामार्फत करतात. आरोपी संजय फोके हा त्यांच्याकडे २० वर्षांपासून जमीन-खरेदी विक्रीचे व्यवहार करायचा. त्याने राजू राठोडची अग्रवालशी भेट घालून देत त्यालाही सोबत घेतले. त्यानंतर अग्रवाल यांनी २०२० मध्ये रामानूज व्हेंचर्स नावाने फोके व राठोडसोबत मिळून भागीदारी कंपनी सुरू केली. यामध्ये ५० टक्के शेअर्स अग्रवाल यांचे तर २५-२५ टक्के फोके आणि राठोडकडे होते.

Marathwada Crime
Jayakwadi Dam : जायकवाडीतून कुठल्याही क्षणी विसर्ग, धरणामध्ये ८३ टक्के पाणीसाठा

सप्टेंबर २०२० मध्ये व्हॅस्कॉन इंजिनिअर्स, पुणे यांच्या मराठवाडा रिअल्टर्स आणि अलमेट या दोन सबसिडरी कंपन्या विक्री असल्याने खरेदीचा निर्णय घेतला. अग्रवाल यांच्या सिद्धी फायबरद्वारे अलमेट कॉर्पोरेशन आणि राठोड व फोके यांच्या बालाजी बिल्डरद्वारे मराठवाडा रिअल्टर्स ही खरेदी करण्याचे ठरले. ३० कोटी ८१ लाखात व्हॅस्कॉनसोबत करारनामा करण्यात आला. मात्र फोके व राठोडने अग्रवाल यांना बालाजी बिल्डर्सची ऐपत नसल्याचे सांगून रामानूज व्हेंचर्स या भागीदारीतील कंपनीद्वारे व्यवहार करण्यास सांगितले. फेब्रुवारी २०२१ मध्ये मराठवाडा रियल्टर्सच्या शेअर ट्रान्स्फरसाठी ५० टक्के अग्रवाल तर प्रत्येकी २५ टक्के फोके व राठोड अशी भागीदारी ठरली.

तसेच अलमेट या कंपनीच्या खरेदीत १०० टक्के भागीदार अग्रवाल यांच्या सिद्धी फायबर्स संस्थेला देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे शेअरच्या हस्तांतरणाचा मे २०२३ मध्ये मन्सूर दलालने अग्रवाल याना ईमेल केला. अलमेट कंपनीचा करारनामा झालेला नव्हता. सप्टेंबर २०२२ मध्ये फोके आणि राठोड यांनी मराठवाडा रिअल्टर्स व अलमेट कंपनीच्या जमिनीचे इंडस्ट्रियलचे कमर्शियल प्लॉटमध्ये रूपांतर करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी एमआयडीसीला २ कोटी ८५लाख आणि १ कोटी १ लाख रुपयांचे चलन भरण्यात आले. त्याचवेळी तिघांच्या मालकीच्या रामानूज व्हेंचर्सकडून मव्हॅस्कॉनफ्ला १३ कोटी ३९ रुपये देण्यात आले. तसेच अॅलमेंट कंपनीचे पैसेही अग्रवालांनी पाठवले. त्याचवेळी फोके व राठोड यांनी मराठवाडा रिअल्टरर्स कंपनीची १६ हजार ७६० स्क्वेअर मीटर जागेवर प्लॉटिंग करून ४७ प्लॉट तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली. त्याची इसारपोटी १२ कोटी ४५ लाख जमा झाले.

रुग्णालयात भरती होताच डाव साधला

अग्रवाल यांना डेंग्यू झाल्यावर मुंबईला उपचारासाठी हलवले होते. त्याच काळात फोके व राठोड यांनी व्हॅस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून २८ मार्च रोजी मराठवाडा रिअल्टरर्स आणि ३१ मार्च २०२५ रोजी अलमेट कॉर्पोरेशनचे १०० टक्के शेअर स्वतःच्या नावे ट्रान्सफर करून दोन्ही कंपन्या हडप केल्या. विशेष म्हणजे व्हॅस्कॉन कंपनीने बीएसई आणि एनएसईला दोन्ही कंपन्या ३० कोटी ८१ लाखांत राठोड आणि फोकेला विक्री केल्याचे कळविले. त्यासाठी सर्वांनी मिळून २०२१ मध्ये तयार केलेला शेअर ट्रान्स्फर करारनामा रद्द करून नवीन तयार केला.

कॉसमॉस बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरले

अग्रवाल, फोके व राठोड यांची भागीदारी कंपनी रामानूजचे बँक खाते सिडको एन-५ भागातील कॉसमॉस बँकेच्या शाखेत आहे. अग्रवाल यांची व्यवहारास सहमती नसताना बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून अग्रवाल यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अपहार करण्यात आला. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मागर्दर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news