School Bus News : शाळा सुरु होताच २ हजार स्कूलबस येणार रस्त्यावर

आरटीओकडून लवकरच सुरू होणार तपासणी मोहीम
School Bus News
School Bus News : शाळा सुरु होताच २ हजार स्कूलबस येणार रस्त्यावरPudhari
Published on
Updated on

As soon as schools reopen, 2,000 school buses will hit the roads.

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जून महिना उजाडला आहे. लवकरच शाळांतील मुलांचा किलबिलाट वाढणार आहे. त्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी शहर व जिल्ह्यात सुमारे २ हजार ५०० पेक्षाही जास्त केवळ स्कूलबस असून, त्या रस्त्यावर उतरणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच आरटीओ कार्यालयाच्या वतीने तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

School Bus News
Wedding hall traffic problem : उदगीरात मंगल कार्यालयाची मनमानी, पार्किंगबाबत बेफिकिरी

१५ जूननंतर शाळा सुरू होताच स्कूलबस रस्त्यावर येणार आहेत. शहर व जिल्ह्यात केवळ इंग्रजी शाळांची संख्या सुमारे ५५० आहे. तर अनेक मोठ्या मराठी शाळाही आहेत. त्यांच्या स्वतः च्या स्कूलबस आहेत. अनेक शाळा शहरात व शहराबाहेर असल्याने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शाळांनी स्कूलबस ठेवल्या आहेत.

या बस १५ जूनपासून रस्त्यावर उतरणार असल्याने वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याने वाहनध- ारकांना शहरासह शहराबाहेरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

School Bus News
Sambhajinagar News : रिक्षांच्या गराड्याने प्रवाशांना बाहेर पडणे मुश्कील

स्कूलबसचा हा आरटीओ कार्यालयात नोंदवण्यात आलेला आकडा ५५० आहे. याशिवाय अनेक वाहनांचा स्कूलबस म्हणून वापर केला जात असल्याने रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या अडीच हजारांच्या घरात जाणार आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस, रिक्षा व इतर वाहनांची तपासणी मोहीम आरटीओ कार्यालय लवकरच हाती घेणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे जे नियम आहेत ते नियम सर्वांनी पाळून कारवाई टाळावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

काही शाळा सुरू

दरम्यान, काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा या एप्रिलपासूनच सुरू असल्याने त्या शाळांतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूलबस आधीच रस्त्यावर आहेत. परंतु हे प्रमाण कमी असल्याने सध्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही. परंतु १५ जूनपासून मात्र यात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.

रिक्षाही होणार सक्रिय

शहरातील शाळांत आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी अनेकांनी रिक्षा लावल्या आहेत. शहरात सुमारे २ हजार रिक्षा विद्यार्थ्यांची विविध शाळेत ने-आण करण्याचे काम करतात. या रिक्षाही १५ जूनपासून रस्त्यावर उतरणार आहेत. रिक्षांबरोबर छोटा हत्तींतूनही विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येत असल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news