

Santosh Deshmukh Murder Case
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (दि.१७) फेटाळून लावला. त्यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमाशी संवाद साधताना आम्हाला न्याय मिळायला, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिले जाण्याची चर्चा सुरु असल्याबाबत विचारणा केली. त्यावर धनंजय देशमुख म्हणाले की, धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणे म्हणजे १०० वाल्मिक कराड, १ हजार टोळ्या निर्माण करणे, निष्पाप शेकडो खून होतील. यावर शासनाने विचार करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. .
देशमुख पुढे म्हणाले की, खऱ्या अर्थाने बोलतो हा न्याय काव्यात्मक आहे. पण, माझ्या भावाला ज्याने संपवलं. त्याला राष्ट्र संत भगवान बाबा जयंती दिवशी मकोका लावला, मकोका लावण्याचा कायदा ज्यांनी केला. ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी युक्तिवाद झाला. आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला. आम्हाला न्याय मिळायला आज सुरुवात झाली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. धनंजय मुंडेंना मंत्री पद दिले तर आमच्यावर दबाव येऊ शकतो. तसे पत्र सुद्धा मी न्यायालयात देणार आहे. ही टोळी कशी राजश्रयात होती, हे मी उघड करेल, असेही देशमुख यांनी सांगितले.