Anganwadi News : उघड्यावर भरणाऱ्या अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

जि. प.चा व्हीबी जी रामजी योजनेतून निधी देण्याचा निर्णय
Anganwadi News
Anganwadi News : उघड्यावर भरणाऱ्या अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत file photo
Published on
Updated on

Anganwadis operating in the open will get a proper roof of their own

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ३ हजार ४२० अंगणवाड्यांपैकी तब्बल ६३३ अंगणवाड्यांकडे स्वतःची इमारत नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये ३२७अंगणवाड्या भाड्याच्या जागेत, २४३ ग्रामपंचायत अथवा शाळांच्या खोल्यांमध्ये सुरू आहेत. तर ६६ ठिकाणी चिमुकल्यांना झाडाखाली, उघड्यावर किंवा शाळांच्या वरांड्यात शिक्षण घ्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने व्हीबी जी रामजी योजनेतून निधी उभारून नवीन अंगणवाडी इमारती उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Anganwadi News
Watershed Development : टोयोटा-किर्लोस्कर करणार जिल्ह्यात पाणलोट विकास

अंगणवाड्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने धाराशिव आणि चंद्रपूर जिल्हा परिषदांच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मिनाक्षी किशोर पवार यांच्या पुढाकाराने या योजनेतील निधीचा वापर करून सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी प्राधान्याने अंगणवाडी इमारती उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भातील ठराव लवकरच जिल्हा परिषदेत मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

या उपक्रमाअंतर्गत सर्वप्रथम उघड्यावर भरणाऱ्या ६६ अंगणवाड्यांसाठी सुरक्षित व स्वतंत्र वर्गखोल्या उभारण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Anganwadi News
Crime News : सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला जन्मठेपेची शिक्षा

एका अंगणवाडीसाठी १८ लाखांचा खर्च

एका अंगणवाडी इमारतीसाठी सुमारे १८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यात ६३३ अंगणवाड्यांसाठी इमारतींची आवश्यकता असताना जिल्हा नियोजन समितीकडून केवळ ३८ इमारतींसाठीच निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे डीपीसीमधील १० लाख रुपये, व्हीबी जी रामजी योजनेतील कुशल घटकातून ५ लाख रुपये आणि अकुशल घटकातून ३.५ लाख रुपये असा निधी एकत्र करून उर्वरित अंगणवाड्यांच्या इमारती उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news