Sambhajinagar Crime : वृद्धेची दीड तोळ्याची चेन सातारा परिसरात हिसकावली

मंदिरातून पूजा करून घराकडे निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी दुचाकीस्वार दोघांनी हिसकावली.
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : वृद्धेची दीड तोळ्याची चेन सातारा परिसरात हिसकावली File Photo
Published on
Updated on

An old man's one and a half tola chain was snatched in the Satara area.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मंदिरातून पूजा करून घराकडे निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी दुचाकीस्वार दोघांनी हिसकावली. ही घटना सोमवारी (दि.३) सकाळी साडेआठच्या सुमारास भीमाशंकर कॉलनी, लोटस अपार्टमेंट, बीड बायपास भागात घडली.

Sambhajinagar Crime
Sambhajinagar News : रस्ते विकास आराखड्याला निधीचा अडथळा

फिर्यादी सुषमा राजेंद्र ब्योहार (६८, रा. फ्लॅट क्र. ३०५, लोटस अपार्टमेंट, बीड बायपास, हॉटेल निशांत पार्कमागे) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्या मंदिरात पूजा करून भीमाशंकर कॉलनीतील रस्त्याने घराकडे पायी निघाल्या होत्या. दुचाकीस्वार दोन चोरटे त्यांच्या पुढे जाऊन काही अंतरावर थांबले.

सुषमा या दुचाकीजवळ जाताच एकाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून तेथून पसार झाले. सुषमा यांनी आरडाओरड केल्याने लोक जमा झाले. काहींनी चोरट्यांचा पाठलाग केला. ते कॉलनीतील दुसऱ्या रस्त्याने पसार झाले होते. दुचाकीवर (एमएच-४३-२७३९) असा नंबर होता.

Sambhajinagar Crime
Solar Energy : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना सौर ऊर्जेसाठी विशेष अनुदान

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस, गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news