मुकुंदवाडीत झोपलेल्या वृद्धांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मारहाण करून रोख रकमेसह मोबाईल हिसकावला
An attempt was made to burn elderly people alive while they were sleeping
मुकुंदवाडीत झोपलेल्या वृद्धांना जिवंत जाळण्याचा प्रयत्नFile Photo
Published on
Updated on

An attempt was made to burn elderly people alive while they were sleeping in Mukundwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी परिसरातील गेट नं. ५६ जवळ एका मद्यधुंद तरुणाने दुकानात झोपलेल्या दोन वृद्धांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात आरोपीने वृद्धांच्या अंथरुणाला आग लावली आणि दुकानातील रोकडसह मोबाईल लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि. २७) मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास घडली. संदीप इंगळे असे आरोपीचे नाव आहे.

An attempt was made to burn elderly people alive while they were sleeping
जि. प. निवडणूक प्रचाराचा आजपासून उडणार खरा धुरळा

फिर्यादी सुभाष भाऊराव निकाळजे (७५) हे २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाल्मीक आश्रम परिसरातील शशिकांत शिंगणे यांच्या दुकानाजवळ बसले होते.

यावेळी ओळखीचा असलेला आरोपी संदीप इंगळे हा दारूच्या नशेत तिथे आला आणि त्याने वृद्धांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढू नये म्हणून निकाळजे आणि शिंगणे तिथून दुसऱ्या दुकानावर निघून गेले, मात्र आरोपीने तिथेही येऊन त्यांना तुम्हाला थोड्या वेळात बघून घेतो, अशी धमकी दिली.

An attempt was made to burn elderly people alive while they were sleeping
मुकुंदवाडी येथे घरात शिरलेल्या चोराला पकडले

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास, जेव्हा निकाळजे आणि शिंगणे हे दुकानाचे शटर ओढून आत झोपले होते, तेव्हा आरोपी संदीप इंगळे याने शटर उघडून आत प्रवेश केला. त्याने शिंगणे यांचा १३ हजारांचा मोबाईल आणि गल्ल्यातील अडीच हजार रुपयांची रोकड चोरली.

इतक्यावरच न थांबता, दोन्ही वृद्ध झोपेत असताना आरोपीने त्यांच्या अंथरुणाला आग लावून दिली. आगीचे चटके बसल्याने निकाळजे यांना जाग आली, तेव्हा त्यांना आरोपी पळून जाताना दिसला. या घटनेनंतर जखमी वृद्धांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

त्यानंतर गुरुवारी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रशांत पासलकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news