Godavari River : गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पैठण : हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क
Godavari River
गोदावरी नदीfile photo
Published on
Updated on

Alert issued to residents along the banks of the Godavari River

पैठण, पुढारी वृत्तसेवा :

हवामान विभागाने पुढील पाच दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह सोसायट्याचे वादळ, गारपिटीचा इशारा दिला आहे. सोमवारी (दि.३०) पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी गोदावरी नदी काठावर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना संबंधित शासकीय विभागाला दिल्या.

Godavari River
खामनदी पात्रातील अवैध बांधकामांवर कारवाई करा

पैठण तालुक्यात सोमवारी सकाळपासून सर्व महसूल मंडळात उन्हाची तीव्रता जास्त होती. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाली. सायंकाळी सहा वाजेदरम्यान तालुक्यातील विहामांडवा, बिडकीन, लोहगाव, पाचोड, दावरवाडी, ढोरकीन, नवगाव, जायकवाडी, पिंपळवाडी, आडुळ, बालानगर, आपेगाव, वडवळी, तुळजापूर, हिरडपुरी, पाटेगाव परिसरात पाऊस जाला. यामुळे शेतासह वीटभट्टीवर एकच तारांबळ उडाली. सध्या शेतकऱ्यांनी शेतातील गहू काढण्याचे काम सुरू केल्यामुळे काढून ठेवलेला गहू भिजून मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळते.

Godavari River
Farmer Death : पूर्वसूचना न देता बोर नदीत सोडले पाणी; वृद्ध शेतकरी गेला वाहून

कर्मचाऱ्यांना खबरदारीची सूचना

हवामान विभागाने पुढील पाच दिवसासाठी अतिवृष्टीसह गारपीट होणार असल्याचा अंदाज जाहीर आहे. पैठण येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी जायकवाडी धरण प्रकल्पावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. संबंधित सर्व शासकीय यंत्रणेला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news