

अजिंठा : अजिंठा गावातील 30 एचपी क्षमतेच्या पाण्याच्या दोन विद्युत मोटारींपैकी एक मोटार नादुरुस्त झाल्याने मागील पंधरा दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे. परिणामी नागरिकांना चार दिवसांऐवजी सहा दिवसांनी पाणी मिळत असून तीव पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
अजिंठा अंधारी प्रकल्पातून गावाला पाणीपुरवठा केला जातो. गावाची तहान भागविण्यासाठी 6.5 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भरण्यासाठी दोन विद्युत मोटारी कार्यरत असताना सुमारे पाच तासांचा कालावधी लागतो. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून एक विद्युत मोटार नादुरुस्त असल्याने केवळ एकाच मोटारीवर पाणी उपसा सुरू असून टाकी भरण्यास तब्बल दहा तास लागत आहेत. याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर होत आहे.
विशेष बाब म्हणजे मागील वर्षीच ग््राामपंचायतीमार्फत 30 एचपी क्षमतेच्या दोन नवीन विद्युत मोटारी जवळपास 4 लक्ष खर्च करून खरेदी करण्यात आल्या होत्या. असे असतानाही संबंधित पुरवठादाराकडून दुरुस्तीची जबाबदारी असताना पंधरा दिवस उलटूनही नादुरुस्त विद्युत मोटार दुरुस्त न करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या धामधुमीत सरपंचांसह सर्व ग््राामपंचायत सदस्य व्यस्त असल्याने गावातील या गंभीर पाणीपुरवठा समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे पालोद व अजिंठा या दोन ग्रामपंचायतींचा प्रभारी कारभार असल्याने त्यांनी मागील पंधरा दिवसांत केवळ दोनदाच ग्रामपंचायतीला हजेरी लावली असल्याची माहिती आहे.
सदरील ग्रामपंचायतचा कार्यकाळ लवकरच संपणार असून व अतिरिक्त प्रभारामुळे गावातील मूलभूत समस्यांकडे सर्वांनीच पाठ फिरवली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. नादुरुस्त विद्युत मोटार तत्काळ दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पाण्याविना नागरिकांची गैरसोय
अजिंठा गाव हे मुस्लिमबहुल गाव असून येत्या दहा ते बारा दिवसांत मुस्लिम समाज बांधवांचा रमजानचा पवित्र महिना सुरू होणार आहे. रमजानच्या काळात रोजा, नमाज व इतर धार्मिक विधींसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मात्र सध्या गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रशासन व ग््राामपंचायतीने तातडीने योग्य निर्णय घेऊन नादुरुस्त विद्युत मोटार दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत ग््राामस्थांकडून व्यक्त केले जात आहे.