

Aircraft hovering in the Vaijapur area
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यात सोमवारी (दि.३०) सायंकाळी एका विमानाने आकाशात बराच वेळ घिरट्या मारल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानकपणे आकाशात सतत फिरणारे विमान पाहून नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या.
वैजापूर परिसरातील रोटेगावसह परिसरातील अनेकांनी हे दृश्य मोबाईलमध्ये कैद केले असून, संबंधित व्हिडिओ सामाज माध्यमांवर व्हायरल झाला. काही काळासाठी विमानाचा संपर्क तुटल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत असून, खराब हवामानामुळेच वैमानिकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान घिरट्या मारत ठेवले असावे, अस प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे
दरम्यान, घिरट्या मारत असलेले हे विमान नंत सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समो आली आहे. दुसरीकडे, खराब हवामानाचा परिणाम छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील उड्डाणांवरह झाला.
दिल्लीहून रात्री ८.५० वाजता येणा इंडिगोचे विमान सुमारे एक तास उशिराने रात्र ९.५५ वाजता पोहोचले. नवी मुंबईहून येणारे विमान ८.२५ ऐवजी ८.५३ वाजता दाखल झाले, त हैदराबादहून ७.५० वाजता येणारे विमान तब्बल दीड तास उशिराने रात्री ९.१९ वाजता आले.