Advantage Maharashtra Expo : एक्स्पोसाठी देश-विदेशांतील १,३५० कंपन्यांचे बुकिंग

शेकडो उद्योजक येणार, स्टार्टअपला चालना मिळून रोजगाराच्या संधी
Advantage Maharashtra Expo
Advantage Maharashtra Expo : एक्स्पोसाठी देश-विदेशांतील १,३५० कंपन्यांचे बुकिंगFile Photo
Published on
Updated on

Advantage Maharashtra Expo: 1,350 companies from India and abroad book for the expo

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नववर्षी ऑरिक शेंद्रा येथे होणाऱ्या महा एक्स्प-गेला देश-विदेशांतील कंपन्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्त हजारो उद्य-ोजकही शहरात येणार असून, एक्स्पोतील एकूण १५२८ स्टॉलपैकी आतापर्यंत १,३५० स्टॉल्सची बुकिंग पूर्ण झाल्याची माहिती मसिआ अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली. एक्स्पोमुळे स्टार्टअपला चालना मिळून रोजगाराच्या शेकडो संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Advantage Maharashtra Expo
Shivshahi bus breakdown : एसटीचा स्पेशल ड्राईव्ह कागदावरच

जिल्ह्यासह मराठवाड्यातील लघुउद्योगांच्या प्रगतीसाठी ऑरिक सिटीत नववर्षी जानेवारी महिन्यात ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो हे जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रदर्शन होणार आहे. या एक्स्पोसाठी मसिआ अध्यक्ष गायकवाड यांच्यासह टीम परिश्रम घेत आहेत.

या अनुषंगाने गुरुवारी मसिआची सर्वसाधारण सभासंपन्न झाली. संयोजक चेतन राऊत यांनी तयारीचा आढावा सादर केला. या प्रदर्शनातील सहभागी प्रमुख आकर्षण असलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित बँड अवगत केले. तसेच जास्तीत जास्त उद्योजकांनी प्रदर्शनात सहभागी व्हावे व त्याचा फायदा आपल्या उद्योगाला करून घ्यावा, असे आवाहनही केले. यावेळी माजी अध्यक्ष अर्जुन गायके, विजय लेकुरवाळे, किशोर राठी, चेतन राऊत, उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, राहुल मोगले, सचिव सचिन गायके, दिलीप चौधरी, कोषाध्यक्ष सर्जेराव साळुंके व राजेश विधाते यांच्यासह दोनशेहून अधिक उद्य-ोजकांनी सहभाग नोंदवला.

Advantage Maharashtra Expo
Temperature Drop : किमान तापमान २ ते ३ अंशांनी घटणार, हवामान खात्याचा अंदाज

औद्योगिक विकासाला मिळेल नवी गती

छत्रपती संभाजीनगर शहर ऑटो हव म्हणून देशभरात ओळखले जाते. त्यात आता नव्याने उभारण्यात येत असलेल्या ई उद्योगामुळे इ-व्हेईकल हब म्हणूनही अग्रस्थानी झळकणार आहे. या नव्या उद्योग साखळीमुळे आणि एक्स्पोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योग, स्टार्टअप्सना चालना मिळेल. यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन शहराच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल असा दृढ विश्वास अर्जुन गायकवाड यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news